शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

-तरच पोलिसांवरील हल्ले थांबतील

By admin | Updated: September 18, 2016 02:32 IST

पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो.

नियम तोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी पोलिसांनाही समुपदेशनाची गरज आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांचे मतनागपूर : पोलीस समाजाचे रक्षक मानले जातात. त्यांच्यामुळेच गुन्हेगारांवर, समाजकंटकावर धाक राहतो. अशा या पोलिसांवरच हल्ले होत असेल आणि ते दुबळे बनत असतील तर ते समाजाच्या हिताचे नाही. त्यामुळे गुन्हेगारांची, समाजकंटकांची, भीती संपेल. पोलिसांना सक्षम बनविण्याची जबाबदारी समाजाचीही आहे. पोलिसांवरील हल्ल्याची वेगवेगळी कारणे आहेत. मात्र, पोलिसांनीही आपली जबाबदारी पार पाडायला हवी. नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हायला हवा. त्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कारवाईच करायला हवी, असा सल्ला आजी-माजी पोलिस अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिला. पोलिसांबद्दलची भीतीच संपलीअत्याचाराची, एखाद्या गंभीर गुन्ह्यांची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीची मदत करण्याची तत्परता पोलीस दाखवत नाही. त्याला ते हेलपाटे घालवायला लावतात. त्यामुळे पोलिसांबद्दल आपुलकी तर राहतच नाही. उलट काहीसा राग निर्माण होतो. दुसरे म्हणजे, पूर्वीचे पोलीस सामाजिक जाणिवेतून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती अन् आदर राहायचा. अलीकडे पोलीस ठाण्यापर्यंतचे अधिकारी, कर्मचारी बऱ्याच प्रकरणात कर्तव्यात कसूर करतात. त्यामुळे त्यांच्याबद्दलची भीतीच संपली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मुजोरी करणे, अंगावर धावून जाणे आदी प्रकार वाढले आहेत. हे टाळण्यासाठी पोलिसांनी समाजाचा विश्वास जिंकण्याची गरज आहे.- बाबासाहेब कंगाले, निवृत्त सहपोलीस आयुक्त नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक द्यागुन्हेगारी संपली पाहिजे, अवैध धंदेही नको अन् वाहतूकही सुरळीत हवी. मात्र, हे करतानाच आम्ही आमची जबाबदारी मात्र दुर्लक्षित करायची. सिग्नल तोडायचा, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करायचे आणि पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्यावर हल्ला करायचा, हा प्रकारच समजण्यापलीकडे आहे. पोलिसांची लाचखोरी या हल्ल्यांना कारणीभूत असल्याचे खरे असले तरी तडजोडीच्या नावाखाली आम्हीच त्यांना लाच देण्यास तयार असतो. पोलिसांनी नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्यास हल्ले होणार नाही. त्यासाठी पोलिसांचे समुपदेशन होण्याची गरज आहे. - रमेश मेहता, निवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी.वाद घालणे टाळा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यासोबत वाद घालू नका, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे. नंतर संबंधितांनी खोट्या तक्रारी किंवा आरोप करू नये म्हणून शक्यतो कारवाईच्या वेळी मोबाईलवर शूटींग करण्याचा सल्लाही पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.- स्मार्तना पाटील,वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त