शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल पंपावर हल्ला करून हप्ता वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:50 IST

इमामवाडा येथील कुख्यात तडीपार गुंड आशिष फ्लैक्स ऊर्फ आशिष अन्ना याने दिवसाढवळ्या मेडिकल चौकातील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून हप्तावसुली केली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हप्तावसुली तसेच हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करून आशिषसह दोन आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देमेडिकल चौकात दिवसाढवळ्या घटना : सहकाऱ्यांसह तडीपार अटकेत

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इमामवाडा येथील कुख्यात तडीपार गुंड आशिष फ्लैक्स ऊर्फ आशिष अन्ना याने दिवसाढवळ्या मेडिकल चौकातील पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला मारहाण करून हप्तावसुली केली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी हप्तावसुली तसेच हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करून आशिषसह दोन आरोपींना अटक केली आहे.आशिष याच्याविरोधात यापूर्वीही हत्या, हत्येचा प्रयत्न, हप्तावसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. इमामवाडा परिसरात त्याची दहशत आहे. यामुळे आठ महिन्यांपूर्वी त्याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतरही तो शहरातच फिरत होता. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता कार क्रमांक एम.एच./१२/ए.एफ./३३६० ने आशिष मेडिकल चौकातील इंडियन आॅयलच्या पेट्रोल पंपावर आला. त्याच्यासोबत तीन साथीदार होते. त्यांनी कारमध्ये १४०० रुपयांचे डिझेल टाकले. पंपावरील कर्मचारी सचिन नंदनकरने आशिषला डिझेलचे पैसे मागितले असता त्याने सहकाºयांसोबत सचिनला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकीही दिली. दुपारची वेळ असल्यामुळे पंपावर गर्दी होती. मारहाण पाहून ग्राहकही घाबरले. पंपावरील व्यवस्थापक विनय कडंबे यांनी आरोपींना समजविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यालाही मारहाण केली. पुन्हा पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पंपावरील कर्मचारी दहशतीत आहेत. ते आशिषला ओळखत होते, पण तक्रार केली तर प्रकरण वाढेल म्हणून ते शांत बसले. ही घटना इमामवाडा पोलिसांना माहिती झाली. त्यांनी व्यवस्थापकाशी संपर्क साधला व आरोपींवर कारवाई करण्याचा विश्वास दिला. त्यानंतर कडंबे यांनी तक्रार दाखल केली. मंगळवारी रात्री आशिष व त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली.मेडिकल चौक बनला गुंडांचा अड्डा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष तडीपार झाल्यानंतरही परिसरात फिरायचा. तो परिसरातील व्यापाऱ्यांकडून हप्तावसुली करतो. मेडिकल चौकातील बहुतांश व्यापारी या हप्तावसुलीने त्रस्त आहेत. काहीवेळा तर रुणांच्या नातेवाईकांनाही याचा फटका बसला. मात्र, तक्रार केली तर जीवाचे बरे वाईट होईल या भीतीने ते चूप बसतात. त्यामुळेच या घटनेत तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांना पुढाकार घ्यावा लागला.घटना सीसीटीव्हीमध्ये कैद हप्तावसुलीची ही घटना पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. आता पोलीस या पुराव्याच्या आधारावर आशिषच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. झोन ४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी नागरिकांना अवैध धंदे किंवा गुन्हेगारांशी संबंधित कुठलीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसArrestअटक