शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारावर हल्लाबोल

By admin | Updated: September 9, 2015 03:11 IST

नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे, बंद असलेले पथदिवे, वस्त्यात साचलेला कचरा, ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेली ग्राहकांची लूट,

काँग्रेसची मनपा कार्यालयावर धडक : ओसीडब्ल्यू, स्टारबस आॅपरेटर घोटाळ्यात कारवाई करा नागपूर : नागपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे, बंद असलेले पथदिवे, वस्त्यात साचलेला कचरा, ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेली ग्राहकांची लूट, लाकूड घोटाळा व स्टार बस कंपनीचा अनागोंदी कारभार या संदर्भात महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी मनपातील विरोधी पक्षनेते व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यक र्त्यांनी मंगळवारी मनपा कार्यालयावर धडक दिली. जोरदार नारेबाजी करीत मनपाच्या गेटसमोर माठ फोडून रोष व्यक्त केला.ओसीडब्ल्यू कंपनीने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा पाणी बिल पाठवून ग्राहक ांची लूट चालविली आहे. वाढीव बिल न भरल्यास तीन दिवसान नळ कापण्याची नोटीस बजावली जात आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. या कंपनीकडे पाणी पुरवठ्याची जबाबदारी सोपविल्यापासून शहरातील विविध भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. लेखा परीक्षणात कंपनीला मनपाने २६ कोटी जादा दिल्याचा ठपका ठेवला आहे. आंदोलकांनी कंपनीवर कारवाई करून पाण्याची देयके बदलून देण्याची मागणी प्रभारी आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे केली. शहरातील प्रवासी वाहतूक सांभाळणाऱ्या वंश निमय कंपनीने केंद्र सरकारकडून मिळालेल्या २६० बसेसची देखभाल न केल्याने अनेक बसेस भंगारात निघाल्या. यामुळे राष्ट्रीय सपत्तीचे नुकसान झाले. कंपनीचा कंत्राट रद्द करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कंपनीला परिवहन महामंडळाचे आठ कोटी भरण्याचे निर्देश द्यावे. तसेच शहरातील खड्डे तातडीने बुजवण्यात यावे. बंद पथदिवे सुरू करावे व शहरातील कचरा दररोज उचलला जावा, अशी मागणी केली. आंदोलनात नगरसेवक दीपक कापसे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर,वासुदेव ढोके, अरुण डवरे, देवा उसरे, सुजाता कोंबाडे, रेखा बाराहाते, पंकज थोरात, सरस्वती सलामे, गजराज हटेवार, उमाकांत अग्निहोत्री, विजय बाभरे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक ,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)