शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ‘ॲट्रॉसिटी’चे प्रमाण वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुरोगामी व पुढारलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख असतानादेखील जातीपातीमधील भेद अद्यापही दूर ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पुरोगामी व पुढारलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख असतानादेखील जातीपातीमधील भेद अद्यापही दूर झालेला नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांवर अत्याचाराची संख्या वाढतच चालली आहे. २०१७ पासून चार वर्षांत राज्यातील ‘ॲट्रॉसिटी’चे प्रमाण वाढीस लागले असून, गुन्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही आकडेवारी अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांवर अत्याचार करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठेला अवमान करण्याबाबत ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात येतो. ‘एनसीआरबी’च्या २०२० सालच्या अहवालानुसार ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांमध्ये देशात राज्याचा पाचवा क्रमांक लागतो. २०१७ मध्ये महाराष्ट्रात ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत २ हजार १५३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. २०१९ मध्ये हाच आकडा २ हजार ७०९ वर गेला, तर २०२० मध्ये ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत ३ हजार २३२ गुन्हे नोंदविण्यात आले. दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांमध्ये अनुसूचित जातींवर झालेल्या अन्यायाचे २ हजार ५६९ तर अनुसूचित जमातींच्या ६६३ गुन्ह्यांचा समावेश आहे.

महिला अत्याचाराचे गुन्हे चिंताजनक

‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या ६६३ गुन्ह्यांचा समावेश आहे. यात अल्पवयीन मुलींवर अत्याचारासाठी ‘पोक्सो’अंतर्गत दाखल झालेल्या तब्बल ९८ प्रकरणांचा समावेश होता.

निर्दोष सुटणाऱ्यांचे प्रमाण अधिक

‘ॲट्रॉसिटी’च्या विविध गुन्ह्यांसाठी ४०० महिलांसह एकूण ७ हजार ६२४ जणांना अटक झाली. यातील ६ हजार ३१८ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली. पोलिसांकडून २०२० मध्ये एकूण अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांविरुद्ध झालेल्या अन्यायासंदर्भात एकूण ४,७८० गुन्ह्यांची चौकशी झाली. यात २०१९ च्या प्रलंबित असलेल्या १,५४७ प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत २,७०८ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १५,१८१ खटल्यांवर सुनावणी झाली. यात केवळ ५१ प्रकरणात १०१ जणांना शिक्षा झाली, तर ३६२ प्रकरणात ८८७ जणांची निर्दोष मुक्तता झाली. ९७.१ टक्के प्रकरणे सुनावणीसाठी प्रलंबित होती.

वर्षनिहाय गुन्हे

वर्ष- ‘ॲट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती)- ‘ॲट्रॉसिटी’ (अनुसूचित जमाती)

२०१७ -१,६८९- ४६४

२०१८ -१,९७४- ५२६

२०१९ -२,१५०- ५५९

२०२० - २,५६९ - ६६३

शिक्षा झालेल्यांची संख्या- निर्दोष मुक्तता

‘ॲट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती)- ८७ - ६९७

‘ॲट्रॉसिटी’ (अनुसूचित जमाती) - १४ - १९०