शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By admin | Updated: August 11, 2016 02:00 IST

अल्पवयीन युवतीसोबत जबरदस्तीने लग्न करून तिचे शारीरिक शोषण करण्याचे प्रकरण पुढे आले आहे.

मुलीला दिला जन्म : पती, पित्याला अटक नागपूर : अल्पवयीन युवतीसोबत जबरदस्तीने लग्न करून तिचे शारीरिक शोषण करण्याचे प्रकरण पुढे आले आहे. संबंधित युवतीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यामुळे तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या घटनेत या अल्पवयीन युवतीचे सावत्र आईवडिल सामील आहेत. पोलिसांनी तिचे सावत्र आईवडिल आणि पतीला अटक केली आहे. मनोज राजकुमार घरडे (३२) आणि राजू मेश्राम (५५) रा. कामगारनगर अशी आरोपींची नावे आहेत. राजूची पत्नी माया फरार आहे. लग्नाच्या चार वर्षानंतर ही घटना उजेडात आली. पीडित युवती १७ वर्षांची आहे. तिच्या जन्मानंतर लगेच तिचे आईवडिल मृत्यू पावले. ती मेश्राम दाम्पत्यासह राहत होती. ते तिच्याकडून घरातील कामे करून घेत होते. एप्रिल २०१२ मध्ये ही युवती १२ वर्षाची झाल्यानंतर त्यांनी मनोज घरडे याच्यासोबत तिचे लग्न लावून दिले. या मोबदल्यात त्याच्याकडून मोठी रक्कम उकळली. कमी वयात लग्न झाल्यामुळे या युवतीच्या मनावर परिणाम झाला. परंतु काहीच माहिती नसल्यामुळे ती काहीच करू शकली नाही. ती मनोजचा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करीत होती. अशातच २०१४ मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर मनोज तिला आणखी त्रास देऊ लागला. मनोज मजुरी करतो. तो या युवतीवर काम करण्याची जबरदस्ती करीत होता. कमी वयात प्रसुती झाल्यामुळे ती अशक्त झाली होती. त्यामुळे ती मजुरी करण्याचे टाळत होती. त्यामुळे मनोज तिला आणखी त्रास देऊ लागला. तो तिला आणि तिच्या मुलीला जेवणही देत नव्हता. अनेकदा त्याने तिला घराबाहेर काढले. काही दिवसांपूर्वी मनोजने तिला पुन्हा घराबाहेर काढले. युवती फिरत फिरत रेल्वेस्थानकावर पोहोचली. तेथे फिरत असताना ६ आॅगस्टला बाल संरक्षण समितीच्या लोकांची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिची चौकशी केली असता तिने आपबिती सांगितली. समितीचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तिला सुधार गृहात नेण्यात आले. तिने दिलेल्या माहितीनुसार ९ आॅगस्टला जरीपटका ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अत्याचाराचा आणि बाल विवाह कायद्यानुसार गुन्हा दाखल करून राजु मेश्राम आणि मनोज घरडेला अटक केली.(प्रतिनिधी) डॉक्टरचाही समावेश अल्पवयीन युवतीने उत्तर नागपुरात एका खासगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिचे वय १४ वर्षे होते. तिच्या शारीरिक अवस्थेवरून तिच्या वयाची सहज कल्पना येते. परंतु तरीसुद्धा डॉक्टरने याची सूचना पोलिसांना दिली नाही. त्यामुळे यात त्या डॉक्टरचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित युवतीच्या दोन वर्षाच्या मुलीसोबतही आपत्तीजनक व्यवहार केल्याची माहिती आहे. त्यामुळे मनोजच्या राक्षसी वृत्तीचा परिचय पोलिसांना आला.