शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मितीत वातावरण तापले

By admin | Updated: February 26, 2017 03:02 IST

ई-निविदा घोटाळा उघडकीस आल्यानंतर खापरखेडा वीज केंद्रातील वातावरण चांगलेच तापले आहे.

नागरिकांत भीतीचे वातावरण : खिडक्यांची तावदाने फुटली, भिंतींना गेले तडे नांद : भिवापूर तालुक्यातील नांद-पिरावा परिसरात असलेल्या वेकोलिच्या खाणीतून ‘ब्लास्टिंग’ करून कोळसा काढला जातो. या ‘ब्लास्टिंग’ची तीव्रता अधिक असल्याने नांद येथील घरांना प्रचंड हादरे बसत असून, या हादऱ्यांमुळे काही घरांच्या खिडक्यांची तावदाने फुटली तर काही घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. ‘ब्लास्टिंग’ने जमीन हलल्यागत होत असल्याने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात वेकोलिच्या ‘गोकुल’ खाणीला मागील वर्षापासून सुरुवात केली आहे. खाणीतील कोळसा बाहेर काढण्यासाठी रोज ‘ब्लास्टिंग’ केले जाते. पिरावा हे गाव खाणीच्या अगदी मध्यभागी आहे. या ‘ब्लास्टिंग’मुळे जमीन अक्षरश: हलत असल्याने नागरिक रोज ‘भूकंप’ अनुभवतात. परिणामी, पिरावाचे पुनर्वसन क्रमप्राप्त असताना पुनर्वसनासाठी वेकोलि प्रशासन नागरिकांना दीड वर्षंपासून झुलवत आहे. नांद या खाणीपासून अर्धा कि.मी. असून, १० हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. ‘ब्लास्टिंग’ची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने नांदलाही हादरे बसतात. नांद येथील बहुतांश घरांचे बांधकाम मातीचे आहे. त्यामुळे गावातील बहुतांश घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. घरांमधील भांडी खाली पडण्याचे प्रकार सामान्य झाले आहे. शुक्रवारी (दि. २४) दुपारी करण्यात आलेल्या तीन स्फोटामुळे जिल्हा परिषद सदस्य नंदा नारनवरे, रा. नांद यांच्या घराच्या खिडक्यांची तावदाने फुटलीत. या संदर्भात वेकोलिचे अधिकारी त्रिपाठी व ठाणेदार रवींद्र दुबे यांना माहिती देण्यात आल्याचे नंदा नारनवरे यांनी सांगितले. या समस्येमुळे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. (वार्ताहर)