शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

एटीएम फाेडणारे दाेघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:11 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : ‘एटीएम’ फाेडून त्यातील रक्कम चाेरून नेणाऱ्या टाेळीतील दाेघांना पकडण्यात वाडी पाेलिसांना यश आले. इतरांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाडी : ‘एटीएम’ फाेडून त्यातील रक्कम चाेरून नेणाऱ्या टाेळीतील दाेघांना पकडण्यात वाडी पाेलिसांना यश आले. इतरांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी व्यक्त केला असून, अटकेतील आराेपींकडून एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही कारवाई शुक्रवारी (दि. १०) मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास वडधामना परिसरात करण्यात आली.

इरफान वकीलखॉं पठाण (वय २९, रा. वडधामना, वाडी) व जमिलउद्दीन नूरउद्दील शेख (२६, रा. बजरंग लेआउट, हसनबाग, खरबी, नागपूर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत. वाडी पाेलिसांचे पथक वडधामना परिसरात गस्तीवर असताना त्यांना या दाेघांसह अन्य एकजण इंडिकॅशच्या एटीएममधून निघाले आणि एमएच-३१/सीएम-५६४३ क्रमांकाच्या कारने पळून जात असल्याचे निदर्शनास आले. पाेलिसांनी त्या एटीएमची पाहणी केली असता, त्यांना मशीन फाेडली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लगेच त्या कारचा पाठलाग करीत नियंत्रण कक्षाला माहिती दिली.

या पथकाने दाेघांना हिंगणा परिसरातून ताब्यात घेत अटक केली. मात्र, तिघांपैकी एकाला अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यश आले. या आराेपींकडून टिकाव, लोखंडी हातोडी, लोखंडी छन्नी, चाकू व कार असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक साजिद अहेमद, गणेश मुंढे यांच्या पथकाने केली.

...

बॅरिकेट्स ताेडले

नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पाेलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून मार्गावर बॅरिकेट्स लावले हाेते. एमआयडीसीचे पाेलीस उपनिरीक्षक ठाकूर यांना एमएच-३१/सीएम-५६४३ क्रमांकाची कार दिसली. त्यांनी ही कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने वेग वाढवून बॅरिकेट्स उडविले व संगम राेडच्या दिशेने पळ काढला. याच मार्गावर कारमधील दाेघांना ताब्यात घेण्यात आले, तर एकजण पळून गेला.