शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस कटरने एटीएम कापून रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 11:01 IST

बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला.

ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर मारला स्प्रे बेसा परिसरातील घटना३ लाख १० हजारांची रोकड लंपास

आॅनलाईन लोकमतनागपूर : बेसा-घोगली मार्गावरील युको बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ३ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी १० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर बँक प्रशासनाला जबर हादरा बसला.हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेसा परिसरात हे एटीएम आहे. सीसीटीव्हीशिवाय सुरक्षेचे दुसरे कोणतेही उपाय येथे नाही. त्यामुळे सोमवारी मध्यरात्रीनंतर लुटारू एटीएमजवळ आले. आपले चौर्यकर्म उघडकीस येऊ नये म्हणून एक लुटारू एटीएमच्या आत शिरला. त्याने विशिष्ट प्रकारचा स्प्रे सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला. त्यानंतर तो आणि त्याच्या साथीदारांनी एटीमच्या शटरचे कुलूप तोडून ते परत लावून घेतले. एटीएमला गॅस कटरने कापून त्यांनी लॉकरच्या विविध कप्प्यातील ३ लाख १० हजार ६०० रुपयांची रोकड ताब्यात घेतली आणि पळून गेले. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास एक ग्राहक रक्कम काढण्यासाठी आतमध्ये गेला तेव्हा त्याच्या लक्षात चोरीचा प्रकार आला. त्याने लगेच बँक आणि पोलिसांना कळविले. त्यानंतर बँकेचे अधिकारी तसेच हुडकेश्वरमधील पोलीस ताफा एटीएमजवळ पोहचला. त्यांनी सीसीटीव्ही डीव्हीआर तपासला असता स्प्रे मारण्यासाठी आलेला एकच लुटारू त्यात दिसला. त्यानंतर बँक व्यवस्थापक सनीप्रकाश प्रदीपकुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हवालदार गौतम बोरकर यांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.४३ हजार शिल्लकएटीएमच्या लॉकरमधील विविध कप्प्यात एकूण ३ लाख ५३ हजार ६०० रुपये होते. त्यापैकी ४३ हजारांची रक्कम लॉकरच्या दुसऱ्या एका कप्प्यात अडकून राहिली. ती लुटारूंच्या नजरेत पडली नाही. त्यामुळे ती शिल्लक राहिली. विशेष म्हणजे, गॅस कटरने एटीएमचे लॉकर कापून यापूर्वीही रक्कम लंपास करण्यात आल्याचे गुन्हे नागपुरात घडले. मात्र, बँकांकडून त्याची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे आता पुन्हा ही घटना घडली. असे गुन्हे करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय टोळीचा या गुन्ह्यात समावेश असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

टॅग्स :bankबँकatmएटीएम