शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणक्षेत्रात खळबळ! अपात्र मुख्याध्यापक नियुक्तीप्रकरणात शिक्षण संस्थाचालकाला घेतले ताब्यात

By योगेश पांडे | Updated: June 6, 2025 22:19 IST

शालार्थ आयडी घोटाळ्यातदेखील आणखी संस्थाचालकांवर संक्रांत

योगेश पांडेनागपूर : बोगस दस्तऐवजांच्या आधारे मुख्याध्यापक नियुक्तीच्या प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या एका संस्थाचालकाला पोलिसांनी भंडारा येथून ताब्यात घेतले. प्रकृतीच्या कारणावरून संस्थाचालकाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षणक्षेत्रात व विशेषत: संस्थाचालकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातही एसआयटीकडून संस्थाचालकांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

चरण नारायण चेटुले (६३, भंडारा) असे संबंधित संस्थाचालकाचे नाव आहे. चेटुले भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे राजश्री शिक्षण संस्था व नवोदय शिक्षण संस्था या दोन संस्थांमध्ये अध्यक्ष आहेत. आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याने नागपूर येथील एस. के. बी. उच्च प्राथमिक, माध्यमिक विद्यामंदिर, यादवनगरची बोगस व बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर उपसंचालक उल्हास नरड यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पद्धतीने राजश्री शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिली. मुन्ना वाघमारेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या घोटाळ्यात पुडके, उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पुडकेच्या कागदपत्रांवर चोटुलेची स्वाक्षरी होती. पोलिसांनी याची खातरजमा केल्यानंतर गुरुवारी रात्री भंडाऱ्यातून चेटुलेला ताब्यात घेतले. त्यांची बायपास सर्जरी झाली असल्याने नागपुरात आणल्यावर अगोदर मेयो व त्यानंतर मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून सुटी मिळाल्यावर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी न्यायालयासमोर पोलिस कोठडीची मागणी केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच घेतले ताब्यात

चरण चेटुले यांचा गुरुवारी वाढदिवस होता. त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आले. पुडकेच्या कागदपत्रांवर त्यांची स्वाक्षरी होती. याअगोदर पोलिसांनी राजू केवलराम मेश्राम या एका संस्था सचिवालाही अटक केली होती.

इतर संस्थाचालक अस्वस्थ

दरम्यान, शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभागी असलेले काही संस्थाचालक अस्वस्थ झाले आहेत. त्यांना एसआयटीकडून लवकरच चौकशीला बोलविण्यात येणार आहे. अनेक संस्थाचालकांपर्यंत ही माहिती जाताच त्यांचे धाबे दणाणले आहेत.