शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तापमान ४५ अंशावर, रुग्ण केवळ दोनच; उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे लेबल

By सुमेध वाघमार | Updated: May 30, 2024 18:29 IST

मेडिकल, मनपाचे शितकक्ष रिकामेच, नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.

नागपूर : उष्माघाताच्या रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठविणे, रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करणे, आदी प्रकार टाळण्यासाठी मनपासह काही शासकीय व खासगी रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून नोंद करून उपचार करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.  

नागपूरचा दाहक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. पाच दिवसांपासून तापमान ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान स्थिरावले आहे.  तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. दुर्लक्ष केल्यास जीवाला धोका होतो. त्यामुळे मेयो, मेडिकलसह मनपाच्या दवाखान्यात शितकक्ष तयार करण्यात आले. परंतु आतापर्यंत मेयोमध्ये केवळ दोन रुग्णांची नोंद झाली. -१०० पैकी १० ते १५ रुग्ण तापाचे    

सुत्रानुसार, विशिष्ट चाचणी केल्यावर उष्माघाताचे निदान होते असेही नाही. उष्माघात व तापाच्या  रुग्णावरील उपचार सारखाच असतो. सध्या मनपासह शासकीय रुग्णालयांमध्ये १०० रुग्णांमधून १० ते १५ रुग्ण तापाचे असतात. मात्र उष्माघाताच्या रुग्णांची नोंद ठेवण्यापासून त्याची माहिती आरोग्य विभागाला पाठविणे व इतरही सोपस्कार पार पाडावी लागतात. हे टाळण्यासाठी डॉक्टर उष्माघाताच्या रुग्णाची तापाचे रुग्ण म्हणून नोंद करतात.संशयित मृतांची संख्या १२मे महिना संपायला आला तरी संशयित मृत्यूचे ‘ऑडिट’ झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी व बुधवारी शहरात सहा मृत्यूची नोंद झाली. तर मागील २५ दिवसांत १२ अनोळखी व्यक्ती बेशुद्धा अवस्थेत सापडले असता त्यांना मेयो व मेडिकलमध्ये दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषीत केले. हा उष्माघाताचा मृत्यू आहे का, हे तपासण्यासाठी ‘डेथ आॅडिट’ समिती आहे. परंतु अद्यापही या समितीची बैठक झाली नाही.