शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत अस्थमाच्या रुग्णांत २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 22:40 IST

शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या १०-१५ दिवसांत अस्थामाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देथंडी, प्रदूषण ठरत आहे कारण खासगीसह मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

ऑनलाईन लोकमत नागपूर : शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या १०-१५ दिवसांत अस्थामाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यात शहरीसोबतच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. केवळ मेयो, मेडिकलच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही रुग्ण दिसून येत आहे.धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सिमेंटचे जंगल म्हणून ओळख निर्माण होऊ घातलेल्या नागपुरात प्रदूषणाची कमी नाही. सध्या धडाक्यात सुरू असलेले मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. थंडीमुळे ही धूळ खालीच राहत असल्याने याचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे उब येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. अनेक लोक सर्रास टायर, प्लास्टिक जाळतात. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. यात थंडी वाढल्याने नागपुरात अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात लहान मुलांसोबतच वयोवृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ते म्हणाले, ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजुक असते. यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ही लक्षणे दिसणाºयांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्या रुग्णालयात १०० रुग्णांमधून २०-२५ रुग्ण अस्थमाचे येत आहेत, असेही ते म्हणाले.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) क्षय व उररोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, या महिन्यात बाह्यरुग्ण विभागात अस्थामाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक रुग्णांशी चर्चा केल्यावर त्यांनी घराच्या बाजूला सुरू असलेले बांधकाम व त्यातून निघणारी सततची धूळ, जळणारा कचरा हे कारण सांगितले आहे.