शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन मोदींच्या स्मरणातही नाही

By admin | Updated: May 16, 2017 02:26 IST

लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला...

शिवाजीराव मोघे : १८ व १९ ला शेतकऱ्यांचे दिल्लीत उपोषणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दाभडी येथे २० मार्च २०१४ ला ‘चाय पे चर्चा’वर शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांची वाईट अवस्था सुधारण्यासाठी विविध योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. भाजपा सरकारला तीन वर्षे लोटूनही एकही आश्वासन त्यांनी पाळले नाही. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पंतप्रधान मोदींच्या स्मरणातही नाही. त्यांना त्याची आठवण देण्यासाठी येत्या १८ व १९ ला दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकरी उपोषण करणार असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने दिलीत आणि लोकांची भरभरून मतेही मिळविली. शेतकऱ्यांच्या मालाला नफ्याच्यावर ५० टक्के हमीभाव, शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रीयकृत बँकाकडून अल्पव्याजदरात कर्ज, कापूस होत असलेल्या यवतमाळ, अमरावती भागात त्यावरील उद्योग, कृषिमालाच्या दळवणवळणासाठी स्वतंत्र रेल्वेची सुविधा, कृषिमाल साठविण्यासाठी खेड्यापाड्यात गोडाऊन, नद्या जोड प्रकल्प अशी एक ना अनेक आश्वासने त्यांनी दिली. शेतकरी आत्महत्या मागच्या सरकारचे पाप असल्याची टीका करून यापुढे कुणीही आत्महत्या करणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा विश्वास त्यांनी दिला होता. मात्र तीन वर्षे लोटूनही मोदींनी एकाही आश्वासनाची पूर्ती केली नसल्याचा आरोप मोघे यांनी यावेळी केला. केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र सरकारच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रात हजारो आत्महत्या झाल्या असून शेतकऱ्यांची अवस्था आणखी वाईट झाली आहे. पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलेल्या देशातील ३३ जिल्ह्यातच आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात फडणवीस सरकारने ‘काँग्रेसचे धरण’ म्हणून निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पूर्ण केले नाही. त्यामुळे सहा लाख हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी केला. हे सरकार शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.पंतप्रधानांना आठवण देण्यासाठी आर्णी तालुका काँग्रेस कमिटी व आर्णी विधानसभा युवक काँग्रेसतर्फे गेली दोन वर्षे दाभडी व आर्णी येथे प्रतिकात्मक चाय की चर्चा हे आंदोलन केले. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने आता थेट दिल्लीतच आंदोलन घेण्यात येत असल्याचे मोघे यांनी सांगितले. जवळपास २०० शेतकरी या लाक्षणिक उपोषण आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’भाजपातर्फे शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी राज्यात लवकरच संवाद यात्रा काढली जाणार आहे. याविषयी विचारले असता शिवाजीराव मोघे यांनी भाजपाची संवाद यात्रा ‘बकवास’ असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे रावसाहेब दानवे हेच या यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने या सरकारची मानसिकता स्पष्ट होत असल्याची टीका त्यांनी केली. आश्वासन पूर्ण करण्यात आणि शेतकऱ्यांची अवस्था सुधारण्यात हे सरकार अपयशी ठरल्याने लोकांचे मन वळविण्यासाठी ही यात्रा काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.