शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मूल्यांकन व प्रवेश धाेरण वादाच्या भाेवऱ्यात; ग्रामीण विद्यार्थ्यांना पडावे लागेल गावाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:30 IST

Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहुशार विद्यार्थ्यांवर परिणामाची शक्यता 

आशिष दुबे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शालेय शिक्षण विभागाने वर्ग १० वीचे मूल्यांकन आणि ११ वीच्या प्रवेशासाठी तयार केलेले धाेरण वादाच्या भाेवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे धाेरण सुटसुटीत करण्याऐवजी आणखी गुंतागुंतीचे केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हुशार विद्यार्थ्यांना नुकसान हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वर्ग १० वीचा निकाल आंतरिक मूल्यांकनाच्या आधारावर घाेषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत निर्धारित निकषानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या आंतरिक मूल्यांकनाचे ३० गुण दिले जातील. हाेमवर्क, ताेंडी परीक्षा, प्रयाेग परीक्षेच्या आधारावर २० गुण दिले जातील. इयत्ता ९ वीच्या विषयवार अंतिम निकालाच्या आधारे ५० टक्के आणि १० वीच्या आंतरिक मूल्यांकनाच्या ५० टक्केच्या आधारे ५० गुण दिले जाणार आहेत. मात्र गेल्या वर्षीही काेराेनामुळे वर्ग ९ ची परीक्षा झाली नव्हती. काही शाळा साेडल्या तर बहुतेक शाळांमध्ये वर्ग १० वीचे ऑनलाईन व ऑनलाईन वर्गही झालेले नाहीत. अशावेळी आंतरिक मूल्यांकन काेणत्या आधारे करणार, हा माेठा प्रश्न आहे. दुसरीकडे वर्ग ११ वीच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्याची घाेषणा केली, पण तीही ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. मात्र ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही सांगितले गेले आहे. त्यांचा प्रवेश झाल्यानंतरच रिक्त जागांवर सीईटी न देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया कधीपर्यंत चालणार, सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती राऊंड हाेतील, एखाद्या महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्या नाही तर विद्यार्थ्यांना प्रवेश कसा मिळणार, असे अनेक प्रश्न उपस्थित हाेत आहेत. हे प्रश्न यासाठी कारण, ११ वीत प्रवेश घेताना विद्यार्थी घराजवळच्या महाविद्यालयांना प्राधान्य देत असतात. शिक्षण विभागाच्या या धाेरणामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या महाविद्यालयात जावे लागणार आहे.

सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी कुठे जाणार?

शालेय शिक्षण विभागाने ११ वीचे प्रवेश घेताना सीबीएसई, आयसीएसई व ओपन स्कूल बाेर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी काय निकष असणार, हे स्पष्ट केले नाही. या विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार की नाही, या विद्यार्थ्यांसाठी काेणता अभ्यासक्रम असेल, या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाच्या आधारावर सीईटी द्यावी लागणार, अशा अनेक प्रश्नांचे उत्तर स्पष्ट नाही.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी धाेरण स्पष्ट नाही

ग्रामीण व दूरवरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी काय धाेरण आहे, हेही स्पष्ट नाही. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ११ वीत प्रवेश कसे मिळाणार, हा प्रश्नच आहे. या विद्यार्थ्यांचे ९ वी व १० वीचे मूल्यांकन कसे हाेणार, हा सुद्धा यक्षप्रश्न आहे.

टॅग्स :ssc examदहावीEducation Sectorशिक्षण क्षेत्र