शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

विधानसभा निवडणूक; कृष्णाचा विजयरथ रोखणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 11:36 IST

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या हालचाली वाढल्याकाँग्रेसची तयारी जोरात पण भाजपचा जोर कायमराष्ट्रवादीचा तगडा दावा

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपूर मतदारसंघात सध्या भाजपचा बोलबाला आहे. गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी मोठ्या मताधिक्क्याने ही जागा जिंकत विरोधकांना धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील मताधिक्य विरोधकांना धडकी भरविण्यासाठी पुरेसे आहे. मात्र, काँग्रेस येथे पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला असून शिवसेनाही एकाएक सक्रिय झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कृष्णा खोपडेंचा विजयरथ रोखला जाणार की ते विजयाची हॅट्ट्रिक मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.पूर्व नागपुरात २००९ पूर्वी सलग पाच वेळा काँग्रेस जिंकत आली आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने कृष्णा खोपडे यांना रिंगणात उतरविले. त्यांच्यासमोर तत्कालीन मंत्री काँग्रेस नेते सतीश चतुर्वेदी यांचे तगडे आव्हान होते. खोपडे यांचा जनसंपर्क दांडगा होता तर चतुर्वेदी यांची मतदारसंघावर पकड होती. अशात काट्याची फाईट होईल, अशी शक्यता वर्तविली गेली. मात्र, निकाल आला तेव्हा खोपडे यांनी तब्बल ३५ हजार २१६ मतांनी एकतर्फी विजय नोंदविला. चतुर्वेदींचे प्रस्थ मोडित काढले. ‘कृष्णाने एकहाती गोवर्धन पेलला’ याचीच चर्चा झाली. खोपडे यांना ८८ हजार ८१४ मते मिळाली तर चतुर्वेदी ५३ हजार ५५९ मतांवर थांबले. बसपाचा फारसा जोर राहिला नाही. जी.एम. खान यांना फक्त ५२५२ मते मिळाली. पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही फेल ठरली. माजी नगरसेवक मोरेश्वर धोटे यांना जेमतेम ३१९६ मते मिळाली.२०१४ मध्ये तब्बल २१ उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून पुन्हा खोपडे मैदानात उतरले. यावेळी चतुर्वेदी मतदारसंघ बदलून दक्षिणमध्ये गेले व अभिजित वंजारी काँग्रेसचे उमेदवार झाले. वंजारी युवा चेहरा होते. फाईट तगडी होईल, असे वाटत असताना खोपडे याही निवडणुकीत ४८ हजार ४७४ मतांनी एकतर्फी जिंकले. खोपडे यांना ९८ हजार ९४३ मते मिळाली तर वंजारी यांना ५० हजार ४६९ मते मिंळाली. या निवडणुकीत काँग्रेसची मते घटली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना वेगवेगळी लढली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनी ८ हजार ४७ मते घेत स्वत:च्या अस्तित्वाची नोंद केली. शिवसेनेचे अजय दलाल यांना ७ हजार ४७१ मतांवर समाधान मानावे लागले. बसपाची मते मात्र दुपटीहून वाढली. दिलीप रंगारी यांना १२ हजार १३६ मते मिळाली.आ. कृष्णा खोपडे यांना तसे पक्षांतर्गत आव्हान नाही. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर इच्छुक आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत गडकरींना मिळालेल्या एकतर्फी आघाडीमुळे खोपडे यांचे तिकीट पक्के मानले जात आहे.काँग्रेसकडून यावेळीही अ‍ॅड. अभिजित वंजारी इच्छुक आहेत तर प्रदेश सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनीही दावा केल्यामुळे अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर नरेश गावंडे, नगरसेवक पुरुषोत्तम हजारे देखील तयारीत आहेत. काँग्रेसचे सर्वच इच्छुक जोरात कामाला लागले आहेत. काँग्रेसचा येथे सातत्याने पराभव होत असल्यामुळे ही जागा यावेळी काँग्रेससाठी सोडावी, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेले व महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेले एकमेव नगरसेवक व पक्षाचे गटनेते दुनेश्वर पेठे इच्छुक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे.शिवसेनेची सक्रियता मतदारसंघात एकाएक वाढली आहे. माजी खासदार प्रकाश जाधव, अलका दलाल, चिंटू महाराज, गुड्डू रहांगडाले आदी इच्छुक आहेत. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला. ते देखील दक्षिणसह पूर्ववर दावा करू शकतात. बसपा व वंचित बहुजन आघाडीने अद्याप पत्ते उघडलेले नाही. नगरसेविका आभा पांडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.समााजिक समीकरणावर भरपूर्व नागपुरात तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्यापाठोपाठ हिंदी भाषिक व छत्तीसगडी समाजाची संख्या मोठी आहे. कुणबी समाजाचेही दखलपात्र अस्तित्व आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामाजिक समीकरणांचा मेळ बसविण्याचे प्रयत्न सर्वच पक्षाकडून होतील. आपल्या विरोधकाची मते कापण्यासाठीही आतापासूनच रणनीती आखणे सुरू झाले आहे.लोकसभेत गडकरींना दिले ७५ हजारावर मताधिक्य४२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व नागपुरातून भाजप नेते नितीन गडकरी यांना १ लाख ३५ हजार ४५१ मते मिळाली होती तर काँग्रेसचे नाना पटोले ६० हजार ७१ मतांपर्यंत मजल मारू शकले. गडकरींना तब्बल ७५ हजार ३८० मतांची आघाडी मिळाली. बसपा व वंचित बहुजन आघाडीचा जोर चालला नाही. बीआरएसपी तर ५०० मतांवरही पोहचू शकली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक