शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कथित प्रेमप्रकरणावरून प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कथित प्रेमप्रकरणावरून एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला चढवला. यात आकाश अशोक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कथित प्रेमप्रकरणावरून एका दाम्पत्याने शेजारी राहणाऱ्या तरुणावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला चढवला. यात आकाश अशोक वर्मा (वय २७) हा गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. राजू बेनीप्रसाद सिरसाम (वय ३६) आणि त्याची पत्नी या दोघांना या प्रकरणी पोलिसांनी अटक केली.

जखमी आकाश आणि आरोपी राजू अत्रे ले-आऊटमधील धनगरपुऱ्यात शेजारी शेजारी राहतात. राजूच्या नात्यातील १७ वर्षीय मुलगी शुक्रवारी घरून निघून गेली. आकाश वर्मासोबत ती सोनेगाव तलावाकडे दिसली. आकाश तिला फूस लावून पळवून नेण्याच्या तयारीत असल्याचा संशय आल्याने राजू संतप्त झाला. त्यामुळे तो आणि त्याची पत्नी असे दोघे शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास आकाशच्या घरी जाब विचारायला गेले. राजूने छोट्या दांड्याची कुऱ्हाड लपवून सोबत नेली. आकाशच्या घरी मुलीला पळविण्याच्या मुद्यावरून त्यांचा वाद झाला. तो टोकाला गेल्यानंतर राजूने आकाशच्या डोक्यावर कुऱ्हाड मारून त्याला गंभीर जखमी केले. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी आरोपीला पकडले. जखमी राजूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी कोमल संदीप गायकवाड (वय ३०) यांच्या तक्रारीवरून आरोपी राजू आणि त्याच्या पत्नीविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

---

दोन दिवसांची कोठडी

आरोपी सिरसाम दाम्पत्याला अटक करून पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. त्यांचा २ दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

---