शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

सनदी लेखापालावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: May 26, 2017 02:45 IST

एका सनदी लेखापालाच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात विलास कोळी (वय अंदाजे ४४) गंभीर जखमी झाले आहे.

मालमत्तेचा वाद : नातेवाईक बनला शत्रू लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका सनदी लेखापालाच्या डोक्यावर हातोडीने वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात विलास कोळी (वय अंदाजे ४४) गंभीर जखमी झाले आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज रात्री झालेल्या या हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास कोळी हे चार्टर्ड अकाऊंटंट (सनदी लेखापाल) गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास सदर परिसरात एका पानटपरीवर पान खायला आले होते. तेवढ्यात मागून अ‍ॅक्टिव्हावर आलेल्या दोनपैकी एका आरोपीने मोठमोठ्याने शिवीगाळ करीत कोळी यांच्या डोक्यावर हातोडीचे फटके हाणले. यामुळे कोळी गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीने आजूबाजूच्यांच्या मदतीने त्यांना लगेच बाजूच्या खासगी इस्पितळात दाखल केले. या घटनेची माहिती कळताच सदर पोलिसांचा ताफा पोहचला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या अ‍ॅक्टिव्हाचा क्रमांक मिळाल्यानंतर आरोपींची पोलिसांनी शोधाशोध केली. कोळी यांच्या नात्यातील महिलेच्या नावावर ही अ‍ॅक्टिव्हा होती. महिलेला विचारपूस केली असता तिच्या अन्य एका नातेवाईकाने ती काही वेळेपूर्वी नेल्याची माहिती मिळाली. त्यावरून सुमंत खणसेवार याने एका साथीदाराच्या मदतीने कोळी यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. मालमत्तेच्या वादातून हा हल्ला झाल्याचेही नातेवाईकांच्या बयानातून स्पष्ट झाले. यापूर्वीही याच कारणावरून कोळींसोबत त्यांचा वाद झाला होता आणि कोळींच्या तक्रारीवरून आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीचे मोबाईल स्वीच्ड आॅफ कोळी यांच्यावर हल्ला चढवणाऱ्या आरोपीचे नाव, पत्ता मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र, त्याचे संपर्क क्रमांक स्वीच्ड आॅफ असल्याची रेकॉर्ड वाजत होती. परिणामी वृत्त लिहिस्तोवर आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.