शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

कर्मचाऱ्यांचा कंपनीच्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कंपनीचा अधिकारी पक्षपातीपणाची वागणूक देतो, असा आरोप करून एका कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांसह येऊन लाकडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कंपनीचा अधिकारी पक्षपातीपणाची वागणूक देतो, असा आरोप करून एका कर्मचाऱ्याने त्याच्या साथीदारांसह येऊन लाकडी फळी तसेच चाकूने हल्ला केला. यात अधिकाऱ्याचे डोके फाटल्याने तो गंभीर जखमी झाला. महापालिकेच्या झोन क्रमांक-४मधील बैद्यनाथ चौकाजवळच्या कचरा वाहनतळामध्ये गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव विशाल युवराज जनबंधू (वय ३८) असे आहे.

वैशालीनगरातील रहिवासी असलेले जनबंधू एजी एन्व्हायरमेंट कंपनीत झोन इन्चार्ज आहे. ही कंपनी महापालिकेंतर्गत कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे काम करते. कंपनीत अनिकेत सुरेश पत्रे (वय २१) हा कामावर होता. त्याचे काम चांगले नसल्यामुळे त्याला अनेकदा ताकीद देण्यात आली होती. जनबंधू यांनी अनिकेतला गेल्या आठवड्यात चार दिवसासाठी कामावरून निलंबित केले. आज दुपारी २.३०च्या सुमारास अनिकेत त्याच्या एका साथीदारासह कार्यालयात आला. येथे त्याने जनबंधू यांच्याशी वाद घातला. ते पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करून शिवीगाळ करीत अनिकेतने लाकडी फळीने जनबंधू यांच्या डोक्यावर जोरदार फटका मारला. त्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अशास्थितीत आरोपी अनिकेतने त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर आरोपी अनिकेत आणि त्याचा साथीदार शिवीगाळ करीत पळून गेले. या घटनेमुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी जनबंधू यांना पाचपावलीच्या एका खासगी इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीवरून गणेशपेठचे ठाणेदार भारत क्षीरसागर यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर रुग्णालयात जनबंधू यांना विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र जनबंधू यांची प्रकृती गंभीर असल्याने ते फारसे काही सांगू शकले नाही. कार्यालयातील सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरोपी अनिकेत आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.

---