शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममध्ये मदत मागणे महागात पडले

By admin | Updated: May 17, 2017 15:25 IST

एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका तरूणीला मदत मागणे महागात पडले. अनोळखी इसमाने याचा फायदा घेत तरूणीकडून एटीएम कॉर्ड, पासवर्ड घेवून दुसऱ्या एटीएममधून ४० हजार काढले.

आॅनलाईन लोकमतभंडारा : एटीएममधून पैसे काढण्यासाठी एका तरूणीला मदत मागणे महागात पडले. अनोळखी इसमाने याचा फायदा घेत तरूणीकडून एटीएम कॉर्ड, पासवर्ड घेवून दुसऱ्या एटीएममधून ४० हजार काढले. ही घटना काल मंगळवारी साकोली येथे घडली. या प्रकरणी प्रगती नानाजी कांबळे, या तरुणीने साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुरमाडी (बारव्हा) येथील रहिवासी असलेल्या प्रगती कांबळे ही २० वर्षीय तरुणी साकोली येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएम मध्ये रक्कम काढण्यासाठी दुपारी १२.३० च्या सुमारास गेली होती. एटीएममधून रक्कम निघत नसल्याने तिने बाजूला उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाला मदत मागितली. सदर इसमाने तरुणीकडून एटीएम कार्ड व पासवर्ड मागितला. तसेच तरुणीचा एटीएम स्वत:जवळ घेऊन आपल्याजवळील एटीएम तरुणीला दिला. तसेच भंडारा येथील एका एटीएममधून कार्ड व पासवर्डचा वापर करून तरुणीच्या खात्यातून ४० हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रगतीने साकोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध भादंविच्या ४२०, सहकलम ६६ सीआयटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक वर्मा करीत आहेत.