शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अशोक धवड यांना हायकोर्टाचा दणका : अटकपूर्व जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:19 IST

ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना बुधवारी जोरदार दणका बसला. बँकेतील घोटाळ्यामध्ये सहभाग व अन्य बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

ठळक मुद्दे नवोदय अर्बन बँक घोटाळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला मारणारे नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चे अध्यक्ष व माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) यांना बुधवारी जोरदार दणका बसला. बँकेतील घोटाळ्यामध्ये सहभाग व अन्य बाबी लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी हा निर्णय दिला. आर्थिक घोटाळे समाजात कर्करोगासारखे पसरत असून घोटाळेबाजांची संख्याही सतत वाढत आहे. त्यामुळे अशी प्रकरणे कठोरतेने हाताळणे आवश्यक आहे असे मत न्यायालयाने हा निर्णय देताना व्यक्त केले.धवड व त्यांच्या साथीदारांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे बँक व ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. धवड हे अध्यक्ष म्हणून बँकेच्या सर्व व्यवहारासाठी जबाबदार आहेत. बँकेतील पैसे उचलताना नियमांचे पालन करण्यात आले नाही. धवड यांच्या दबावामुळे अवैधरीत्या मोठमोठ्या रकमा काढण्यात आल्या. तसेच, मुद्दामून कर्ज थकवणाऱ्या काही लोकांसोबत नियोजित पद्धतीने तडजोड करण्यात आली. एवढेच नाही तर, सत्र न्यायालयातून तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर धवड यांनी घोटाळ्याचा तपास प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दुरुपयोग झाला. त्यांना २९ जून, १ जुलै व ३ जुलै रोजी सत्र न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता, पण ते तिन्ही तारखांना गैरहजर राहिले. या सर्व बाबी लक्षात घेता धवड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला असून या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.किरण धवड यांना दिलासाअशोक धवड यांच्या पत्नी व बँकेच्या संचालिका किरण धवड (५९) यांना दिलासा मिळाला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून आला नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. धवड दाम्पत्यातर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAshok Dhawadअशोक धवड