शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आशिष जैनला दुहेरी मुकुट

By admin | Updated: May 23, 2017 02:15 IST

लोकमतचा अव्वल मानांकित खेळाडू आशिष जैनने रोमहर्षक लढतीत दमदार पुनरागमन करीत एसजेएएन-मीडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला.

एसजेएएन मीडिया बॅडमिंटन : मिश्र दुहेरीचेही विजेतेपद, पुरुष दुहेरीत उपविजेतालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमतचा अव्वल मानांकित खेळाडू आशिष जैनने रोमहर्षक लढतीत दमदार पुनरागमन करीत एसजेएएन-मीडिया बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजेतेपदासह जैनने जेतेपदाची ‘हॅट्ट्रिक’ साधली, हे विशेष. आशिष जैनने एकेरीत सहाव्यांदा जेतेपद पटकावले. स्पोर्टस् जर्र्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर (एसजेएएन) व गायकवाड-पाटील ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच धनवटे नॅशनल कॉलेजच्या सहकार्याने काँग्रेसनगर येथील डीएनसी संकुलात तीन दिवसांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जैन-नायसे यांच्यातील अंतिम सामना रोमांचक ठरला. पहिल्या गेममध्ये १४-२१ असे पराभूत झाल्यानंतर गतविजेत्या आशिष जैनने दमदार पुनरागमन करीत उर्वरित दोन्ही गेम २१-१७, २१-१३ असे जिंकून जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. त्याआधी आशिषने प्रज्ञा बॅनर्जीच्या सोबतीने मिश्र दुहेरीचे देखील विजेतेपद पटकविले. अंतिम सामन्यात या जोडीने टीओआयचे सुहास नायसे-प्रीती यादव जोडीवर २१-१४, २१-१३ अशी मात केली.पुरुष दुहेरीच्या निर्णायक सामन्यात मात्र सुहास नायसे-फकरु द्दीन बोहरा जोडीने गतविजेती लोकमतची जोडी आशिष जैन-रविराज अंबडवार यांचा २१-१४, १५-२१, २१-१९ असा तीन गेममध्ये पराभव केला.महिला एकेरीचे विजेतेपद लोकसत्ता संघाची राखी चव्हाण हिने पटकावले. अंतिम सामन्यात राखीने तरुण भारतची खेळाडू पूजा लोहे हिच्यावर २१-९, २१-१४ ने मात केली.तत्पूर्वी, एकेरीच्या उपांत्य फेरीत जैनने तिसरा मानांकित सुजन मसीदला पराभूत केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सुहास नायसेने फकरु द्दीन बोहराला नमवले. धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे आणि गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य शबीह चौरासिया यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी एसजेएएनचे अध्यक्ष किशोर बागडे आणि सचिव संदीप दाभेकर उपस्थित होते. कार्यक्र माचे संचालन डॉ. राम ठाकूर यांनी केले.स्पर्धेचे निकाल पुरुष एकेरी(अंतिम सामना):आशिष जैन मात सुहास नायसे १४-२१, २१-१७, २१-१३. उपांत्य लढती: आशिष जैन मात सुजान मसीद १८-२१, २१-६, २१-१०. सुहास नायसे मात फकरुद्दीन बोहरा २१-१२, २१-१५.महिला एकेरी (अंतिम सामना):राखी चव्हाण मात पूजा लोहे २१-९, २१-१४.पुरुष दुहेरी (अंतिम सामना): सुहास नायसे- फकरुद्दीन बोहरा मात आशिष जैन- रविराज अंबडवार २१-१४, १५-२१२१-१९.उपांत्य लढती: सुहास नायसे- फकरुद्दीन बोहरा- मात मनीष साखरवाडे- सुनील वॉरियर २१-८, २१-९. आशिष जैन-रविराज अंबडवार मात सुबोध रत्नपारखी- संदीप वर्धने २१-७, २१-१२.मिश्र दुहेरी (अंतिम सामना): आशिष जैन- प्रज्ञा बॅनर्जी मात सुहास नायसे- प्रीती यादव २१-१४,२१-१३.