शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मानाच्या पालख्याच जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:07 IST

नागपूर : आषाढी एकादशीला मानाच्या दहा पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळावी याकरिता नागपुरातील लोकनायक बापूजी अणे ...

नागपूर : आषाढी एकादशीला मानाच्या दहा पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळावी याकरिता नागपुरातील लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. त्यामुळे आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मानाच्या दहा पालख्याच जातील यावर शिक्कामोर्तब झाले.

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. परमेश्वर विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी हा सर्वात मोठा सोहळा आहे. या दिवशी दरवर्षी हजारो पालख्या पंढरपूरला जातात; परंतु कोरोना संक्रमणामुळे गेल्यावर्षीपासून पंढरपूर वारीवर निर्बंध लावले जात आहेत. यावर्षी राज्य सरकारने केवळ दहा मानाच्या पालख्यांना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. कोरोना संक्रमण लक्षात घेता सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यात काहीच अवैधतता नाही. तसेच, हा निर्णय घेताना विदर्भासोबत भेदभाव केल्याच्या आरोपातही काहीच तथ्य नाही. वर्तमान परिस्थितीत अशा धार्मिक सोहळ्याविषयी धोरण ठरवण्यासाठी सरकार हेच योग्य प्राधिकरण आहे. न्यायालय याविषयी आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. संजय करमरकर, तर सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

---------------

असे होते याचिकाकर्त्यांचे म्हणणे

विविध धार्मिक संस्थांनी मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारला निवेदने सादर केली आहेत. वारकरी संप्रदायाच्या भावना लक्षात घेता याचिकाकर्त्या समितीचे अध्यक्ष अमृत दिवाण व संयोजक ॲड. अविनाश काळे यांनीही गेल्या ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी पत्र लिहिले; परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारचे असे वागणे लोकशाही विरोधी आहे. त्यामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. करिता, न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूरला जाण्याची परवानगी देण्याच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.