शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आशा, अंगणवाडी सेविकांचा गडकरींच्या कार्यालयावर मोर्चा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:07 IST

नागपूर : आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या पूर्वनिर्धारित घोषणेनुसार शनिवारी आयटकच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यलयावर ...

नागपूर : आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी आपल्या पूर्वनिर्धारित घोषणेनुसार शनिवारी आयटकच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यलयावर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी मोर्चा अडविल्यावर शिष्टमंडळाने गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

आयटकच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा गडकरी यांच्या कार्यालयाकडे कूच करीत असताना पोलिसांनी त्यांना अडवून हनुमान मंदिराच्या प्रांगणात थांबण्याची सूचना केली. त्यानुसार तिथे थांबल्यावर आंदोलकांची गर्दी वाढतच गेले. दरम्यान, या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. गडकरी यांच्या कार्यलयावर जाऊन चर्चा करण्याची मागणी आंदोलकांची होती. याची दखल घेऊन गडकरी यानी शिष्टमंडळाला त्यांच्या वर्धा रोडवरील निवासस्थानी पाचारण केले. आयटकचे राज्य महामंत्री श्याम काळे, का‌ले, राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. युगल रायलू, वर्षा घिखले यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द केले. महिला प्रसूती रजाही मर्यादित केली. यासह अनेक मागण्यांवर चर्चा झाली. या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून सरकारसोबत चर्च करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, मोर्चाचे रूपांतर सभेत झाले असताना शेतकरी नेते अरुण वनकर, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे नेते चंद्रशेखर मोरया, उषा चारभे, जयश्री चहांदे, मंदा डोंगरे, ज्योती अंडरसहारे, मंगला पांडे, करुणा साखरे आदींनी मार्गदर्शन केले.