नागपूर : आशा व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे राबविले जात आह. परंतू त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात. महामारीत काम करताना काहींना प्राण गमवावे लागले. परिणामी त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले, मुले पोरकी झाली. आशा व गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समावून घ्यावे, २२ हजार किमान वेतन द्यावे, यासह विविध मागण्यासाठी आशा व गट प्रवर्तकांच्या राष्ट्रीय फेडरेशनने सोमवारी २४ मे रोजी संपाची हाक दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तकानी या लाक्षणिक संपात स्वयंस्फूर्तीने सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर,नंदा लीखार, मंगला बागडे, लक्ष्मी कोतेजवार यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
आशा व गटप्रर्वतक सोमवारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST