शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आशा कार्यकर्त्यांचा कोविड-१९ च्या कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:28 IST

आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन पुकारत कोविड-१९ च्या कामांवर बहिष्कार घातला आहे.

ठळक मुद्देआंदोलनाद्वारे मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा व गट प्रवर्तक कर्मचारी युनियन (सिटू) नागपूर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वात आशा कार्यकर्त्यांनी शुक्रवारपासून काम बंद आंदोलन पुकारत कोविड-१९ च्या कामांवर बहिष्कार घातला आहे.आशा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, ते गेल्या चार महिन्यांपासून कोविड सर्व्हेचे काम करीत आहेत. सर्वेसाठी २०० रुपये प्रति दिन देण्यात येणार होते. परंतु आता पैसे नसल्याचे कारण सांगून पैसे देण्यास असमर्थता दर्शविली जात आहे. मनपाच्या आरक्षित निधीमधून आशा कार्यकर्त्यांना ही रक्कम देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी शुक्रवारपासून आशा कार्यकर्त्यांनी कामावर बहिष्कार घालत आंदोलन सुरु केले आहे. संघटनेनुसार आशा कार्यकर्त्यांनी भूमिका ही फ्रंट लाईन वर्कर्सची असल्याची बाब कोविड-१९च्या संकटकाळात संपूर्ण देशाला माहिती झाली आहे. यानंतरही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आपापल्या हातात मागण्यांचे फलक घेऊन मूक आंदोलन केले. सुरक्षित अंतर राखून आंदोलन करण्यात आल्याचा दावाही संघटनेने केला आहे. कोविड-१९ सर्व्हेसाठी २०० रुपये प्रति दिन यानुसार रक्कम देण्यात यावी, एपीएल, बीपीएलची अट रद्द करून सर्वांना समान ३०० रुपये देण्यात यावेत, आशा वर्कर्ससोबत सन्मानपूर्वक व्यवहार करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, मनीषा वारस्कर, अंजू चोपडे, कल्पना हटवार, मंदा गंधारे, पौर्णिमा पाटील, रूपलता बोंबले, नंदा लिखार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाEmployeeकर्मचारी