शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

उपराजधानीत घडले केजरीवाल

By admin | Updated: February 11, 2015 02:19 IST

नागपुरात मिळालेल्या संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले व पुढेदेखील यावरच मार्गक्रमण करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासकीय संस्कार झाले: शहराशी जवळचे नातेनागपूर : नागपुरात मिळालेल्या संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले व पुढेदेखील यावरच मार्गक्रमण करत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. नवी दिल्लीत भाजपा, कॉंग्रेसच्या मोठमोठ्या दिग्गजांची फौज असताना, केजरीवाल यांच्या ‘टीम’ने एकहाती व जवळपास ‘क्लीन स्वीप’ असलेला विजय मिळविला अन् ‘आम आदमी’ प्रमाणेच नागपुरातील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीशी जुळलेल्या आजी व माजी लोकांचा ऊर अभिमानाने भरून आला. मंगळवारी केजरीवाल यांच्या नेतृत्वात ‘आप’ने दिल्लीत ऐतिहासिक विजय मिळविला. यानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये जाऊन त्यांच्याशी जुळलेल्या येथील जुन्या आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अकादमीमध्ये गत २१ वर्षांपासून कार्यरत कर्मचाऱ्यांनी केजरीवाल यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुरक्षा रक्षकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहात होता. (प्रतिनिधी)समाजभावनेतून सुरू केलेली समाजसेवाकेजरीवाल यांच्या साध्या राहणीचे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. त्यांच्यातील समाजसेवकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवातदेखील नागपुरातच झाली. प्रशिक्षणार्थी सहकाऱ्यांचे जुने वापरलेले कपडे ते गोळा करायचे. अनेकांना याचे आश्चर्य वाटायचे. हे कपडे ते काटोल मार्गावरील मदर टेरेसा आश्रमाला द्यायचे. शिवाय अकादमीमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. खोली क्रमांक १६ अन् केजरीवालभारतीय महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर केजरीवाल १९९४-९५ या दरम्यान प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी नागपुरातील छिंदवाडा मार्गावरील प्रत्यक्ष कर अकादमी येथे आले होते. यावेळी त्यांचा मुक्काम अकादमीतीलच ‘नालंदा’ वसतिगृहाच्या खोली क्र.१६ मध्ये होता. या खोलीमध्ये केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था, करव्यवस्था अन् समाजाशी जुळलेल्या विविध मुद्यांबाबत वाचन केले. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायचीच ही त्यांची जिद्द असायची. एखादा मुद्दा सखोल जाणून घ्यायचा असेल तर ते तहानभूक हरवून वाचत बसत. तब्बल दीड वर्षे येथे राहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. ते ४७ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी होते. विशेष म्हणजे, याच काळात अकादमीमध्ये त्यांची बॅचमेट असलेल्या सुनीता या प्रशिक्षणार्थी तरुणीशी त्यांची मैत्री जुळली आणि नंतर त्या सौ. सुनीता केजरीवाल झाल्या. अशाप्रकारे केजरीवाल यांचे नागपूरशी एक आगळेवेगळे नाते आहे. सहा वर्षांपूर्वी नागपुरात लेक्चर!केजरीवाल यांनी १९९४-९५ मध्ये येथील प्रशिक्षण पूर्ण करून परत गेले. मात्र त्यांच्या मनात अकादमीविषयी निर्माण झालेल्या प्रेमाने त्यांना गत सहा वर्षांपूर्वी पुन्हा येथे खेचून आणले. पाच वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल अकादमीमधील नवीन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी अकादमीमधील वैशाली गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम केला होता.