शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल २७ व २८ जानेवारीला करणार नागपूरचा अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 11:06 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या विशेष पथकासह विकासाचे ‘नागपूर मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी २७ व २८ जानेवारीला संत्रानगरीत येणार आहेत.

ठळक मुद्देदिल्ली सरकारचे विशेष पथक दोन दिवस देणार प्रकल्पांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या विशेष पथकासह विकासाचे ‘नागपूर मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी २७ व २८ जानेवारीला संत्रानगरीत येणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात ते शहरातील विविध विकास प्रकल्पांना भेटी देऊन अभ्यास करणार आहेत.केजरीवाल यांच्या नागपूर दौऱ्यातील कार्यक्रमाचा विचार करता ते शहरातील विविध प्रकल्पासह मेट्रो रेल्वे, ई-चार्जिंग स्टेशन, राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रकल्पांची माहिती जाणून घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम सोमवारी जिल्हा प्रशासन व महापालिकेला मिळाल्याची माहिती आहे. २७ जानेवारीला दुपारनंतर ४.४५ ला त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. अर्धातास विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता विमानतळावरील ई-चार्जिंग स्टेशन, इलेक्ट्रिक टॅक्सी संदर्भात माहिती घेतील. त्यानतंर ७.३० ला इथेनॉलवर धावणाऱ्या ग्रीन बसेसची पाहणी करतील. रात्री रविभवन येथे मुक्काम करतील.दुसऱ्या दिवशी २८ जानेवारीला सकाळी १० वाजता महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेतील. यात भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमधील दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प, त्यानंतर २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना प्रकल्पांचे आयुक्त अश्विन मुदगल सादरीकरण करतील. दुपारी १२ वाजता मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे प्रबंध निदेशक ब्रिजेश दीक्षित प्रकल्पाचे सादरीकरण करतील. एक तासानंतर एनएचआयतर्फे आयएमएस,अजनी व खापरी येथे सादरीकरण होईल. दुपारी २ ते ४ आराम करतील. त्यानंतर ४ वाजता मेट्रो रेल्वेच्या खापरी येथील स्टेशनची पाहणी करून दिल्लीकडे रवाना होतील.

प्रशासन लागले कामालादिल्ली सरकारकडून केजरीवाल यांच्या नागपूर दौऱ्याची माहिती मिळताच महापालिके चे अधिकारी सक्रिय झाले आहेत. मोजक्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यावर चर्चा केली. सादरीकरण व दौऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. वास्तविक स्वच्छता सर्वेक्षणावरून महापालिका प्रशासन आधीच तयारीत आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल