विदर्भाज गॉट टॅलेण्ट स्पर्धेचा शुभारंभ : चिटणवीस सेंटर नागपूर : विदर्भातील प्रतिभावंत कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देणार्या आणि कला सादरीकरणाला प्रतिष्ठित व्यासपीठ प्रदान करणार्या ‘विदर्भाज गॉट टॅलेण्ट’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन आज चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले. सेहोर्स इन्फोबॉजीक्स अँड एन्टरटेन्मेन्ट प्रा. लि. कंपनीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गायन, नृत्य, अभिनय असा वैविध्यपूर्ण कला सादरीकरणाच्या या कार्यक्रमात १२0 बाल युवा स्पर्धकांचा यात सहभाग होता. विदर्भातील कलावारांना राष्ट्रीय पातळीवर कला सादरीकरणाची संधी मिळावी तसेच भावी सिने जगताचा प्रवेश खुला करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रमश: या स्पर्धेचे आयोजन संपूर्ण विदर्भात करण्यात येणर असल्याचे यावेळी आयोजकांनी जाहीर केले. आज सार्वत्रिक लोकप्रियता मिळविणार्या टेलिव्हीजनच्या रिअँलिटी शो प्रमाणेच हे आयोजन करण्यात आले. रंगीबेरंगी नृत्य वेशातील सहभागी हौशी व गुणी कलावंतांचे हे सादरीकरण म्हणजे जणू तारे जमी पर चाच अनुभव होता. आयोजकांतर्फे प्रत्येक भाषेत चार याप्रमाणे हिंदी, मराठी आणि दोन भोजपुरी चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी होणार्या कलावंतांना या चित्रपटात संधी देण्यात येणार आहे. आयोतकांतर्फे कंपनीचे सीएमडी मनिषसिंग चौहान याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण प्रियंका सिंग, श्रृती जैन, अमोल मोनेकर यांनी केले. यावेळी मोठय़ा संख्येने रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विदर्भातील नवोदितांचे कला सादरीकरण
By admin | Updated: May 25, 2014 00:54 IST