शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

रंग, रेषांच्या उत्कृष्ट फॉर्म्सचे कलात्मक प्रदर्शन

By admin | Updated: May 29, 2016 03:01 IST

एका बिंदूतून संपूर्ण डिझाईन आपल्यासमोर प्रगटते. या प्रकटीकरणाचे तंत्र आणि शैली सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे,...

संध्या पांगारकर : जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचे आयोजन नागपूर : एका बिंदूतून संपूर्ण डिझाईन आपल्यासमोर प्रगटते. या प्रकटीकरणाचे तंत्र आणि शैली सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केली आहे, हे प्रदर्शनातील चित्रातून जाणवते. या प्रकाराचे घटक आहेत ते रंग आणि रेषा. या घटकांवर सर्वांनीच घेतलेले परिश्रम त्यांच्या चित्रातून दिसत आहेत. प्रत्येक चित्रात असणारी कलात्मकता प्रेक्षकांना खेचण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास इंटेरिअर डिझाईनर संध्या पांगारकर यांनी शनिवारी व्यक्त केला. स्थापत्यशास्त्रज्ञ श्रीकांत तनखीवाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे ‘लॅण्डस्केप’ या प्रदर्शनाचे आयोजन जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, रामदासपेठ येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संध्या पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दर्डा आर्ट गॅलरीचे समन्वयक अमित गोनाडे, सुजाता तनखीवाले आणि श्रीकांत तनखीवाले प्रामुख्याने उपस्थित होते. हे पेंटिंग्ज आणि स्केचेसचे प्रदर्शन असून, यात रिअ‍ॅलिस्टीक आणि अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज सादर करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी ३० मेपर्यंत दुपारी ४ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत खुले राहील. पांगारकर म्हणाल्या, निसर्ग मुळातच सुंदर असतो. हे सौंदर्य टिपण्याची आणि नेमकेपणाने आपल्या डिझाईनमध्ये आणण्यासाठी एक दृष्टी लागते. त्याशिवाय चित्रात कलात्मकता येत नाही. प्रदर्शनातील अनेक चित्रे रंगरेषांच्या माध्यमातून एक भाव घेऊन आले आहे. विशेषत: छाया-प्रकाशाचा खूप सुंदर उपयोग विद्यार्थ्यांनी केला आहे. श्रीकांत तनखीवाले म्हणाले, कला आणि व्यसन यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो; पण काही लोक नव्या चित्रकारांना चुकीचे मत सांगतात. कलावंताला कुठले तरी व्यसन असते त्याशिवाय कलानिर्मिती होत नाही, हे मत सर्वथा चूक आहे. प्रत्येक कलावंताने त्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपण स्वत: कलावंत आहोत, पण कुठलेही व्यसन नाही. त्यामुळे स्वत:ला या क्षेत्रात घडविताना आपल्या सर्जनतेचा विचार करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रदर्शनात जलरंग, अ‍ॅक्रॅलिक, स्केच आदी सर्व माध्यमात विद्यार्थ्यांनी कलाकृती तयार केल्या आहेत. विशेषत: प्रत्यक्ष एखाद्या स्थळी जाऊन वेगवेगळ्या कोनातून विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘लॅण्डस्केप’ ही या प्रदर्शनाची जमेची बाजू आहे. प्रदर्शनात जवळपास १०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. (प्रतिनिधी)दर्डा आर्ट गॅलरी ही कलावंतांसाठी उपलब्धीआम्हा कलावंतांना दर्डा आर्ट गॅलरीसारखी प्रतिष्ठा असलेली गॅलरी उपलब्ध झाली याचा मनापासून आनंद वाटतो. या गॅलरीत झालेले प्रत्येक प्रदर्शन यशस्वी झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात गॅलरी असल्याने रसिकांना सहजपणे गॅलरीला भेट देता येते आणि कलावंतांच्या कलाकृती मोठ्या प्रमाणात रसिकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळेच दर्डा आर्ट गॅलरीत कलाकृती प्रदर्शित करण्याचे समाधान आहे. - श्रीकांत तनखीवाले