शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट कंपन्यांतर्फे कृत्रिम दरवाढ

By admin | Updated: September 17, 2016 03:17 IST

आपसात तडतोड (कार्टेल) करून सिमेंट कंपन्या सिमेंटची कृत्रिम दरवाढ करीत असल्याचा आरोप विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) केला आहे.

कंपन्यांचे कार्टेल : स्पर्धा आयोगाने चौकशी करावीनागपूर : आपसात तडतोड (कार्टेल) करून सिमेंट कंपन्या सिमेंटची कृत्रिम दरवाढ करीत असल्याचा आरोप विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) केला आहे. स्पर्धा आयोगाने दरवाढीची चौकशी करून कंपन्यांवर दंड आकारण्याची मागणी व्हीटीएने केली आहे. प्रति बॅग ४० ते ५० रुपयांची वाढसर्व सिमेंट कंपन्यांनी १ सप्टेंबर २०१६ पासून सिमेंटच्या दरात प्रति बॅग ४० ते ५० रुपयांची वाढ केली आहे. ३१ आॅगस्ट २०१६ ला भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) जारी केलेल्या अंतिम आदेशानुसार आपसात तडतोड करून सिमेंटच्या किमतीत वाढ केल्याच्या संदर्भात वर्ष २०१२ मध्ये एसीसी, अल्ट्राटेक, जेपी यासह देशातील १० मोठ्या सिमेंट कंपन्यांवर ६७१३ कोटी ३२ लाख रुपयांचा दंड आकारला होता. त्यानंतरही कंपन्या कुणाचीही भीती न बाळगता कृत्रिम दरवाढ करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या संदर्भात व्हीटीएने पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन व भारतीय स्पर्धा आयोगाचे चेअरमन देवेंद्रकुमार सिकरी यांना निवेदन पाठवून सिमेंटच्या दरात गैरकायदेशीररीत्या करण्यात येणाऱ्या दरवाढीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. व्हीटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, सध्या देशात व्यापार-उद्योग मंदीत आहे. अशा स्थितीत सरकारी प्रकल्पांना सोडल्यास खासगी क्षेत्राकडून सिमेंटची मागणीच नाही. त्यामुळे सिमेंटच्या दरात वाढ होण्याचे काहीच कारण नाही. सिमेंट कंपन्या कार्टेल करून सिमेंटच्या किमतीत वाढ करून जनतेला लुटत असल्याचा अंदाज लावता येईल. सरकारने जनतेच्या हिताचा विचार करून या कंपन्यांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले की, भारतीय स्पर्धा आयोग उत्तम कार्य करीत आहे. आयोगाने सिमेंट कंपन्यांवर कोट्यवधींचा दंड आकारल्यानंतरही काहीही परिणाम होत असल्याचे दिसून येत नाही. एका वृत्तानुसार सिमेंट कंपन्यांतर्फे गैरकायदेशीररीत्या करण्यात येणारी सिमेंटची दरवाढ पूर्वी करीत असल्यानुसार करीत आहेत. सर्व कंपन्या दरवर्षी ११ दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन करतात. अर्थात जवळपास २० कोटी सिमेंट बॅग तयार होतात. प्रति बॅग १० रुपयांची वाढ केल्यास कंपन्यांना २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकतो. कोट्यवधींच्या दंडानंतरही सिमेंट कंपन्यांना कायद्याची भीती उरली नाही. स्पर्धा आयोगाने जनतेच्या हिताकडे लक्ष देऊन पुन्हा सिमेंटच्या कार्टेलची चौकशी करून कंपन्यांवर दंड आकारण्याची मागणी व्हीटीएने केली आहे. (प्रतिनिधी)