शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गणपती विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

By admin | Updated: September 27, 2015 02:52 IST

जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक गणपती उत्सवाची धूम सुरू आहे.

कामठीत रोडमार्च : संशयितांवर ठेवणार करडी नजर नागपूर : जिल्ह्यात सर्वत्र पारंपरिक गणपती उत्सवाची धूम सुरू आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३०६ सार्वजनिक गणेशमूर्ती आणि ७२८४ घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी २३७ व सोमवारी ५९ असे एकूण २९६ मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. याच धर्तीवर सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणपती विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता नागरिकांनी तसेच गणेश उत्सव मंडळानी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.नागपूर जिल्ह्यात विशेषत: कामठी शहरात गणपती विसर्जनाकरिता मोठ्या प्रमाणात शोभायात्रा व मिरवणुकीचे आयोजन केले जाते. पोलीस स्टेशन कामठी अंतर्गत शहरात १०७ व ग्रामीण भागात ११ असे एकूण ११८ सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली असून अंदाजे ३५३४ घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. रविवारी व सोमवारी भाविक आपल्या लाडक्या गणरायांना निरोप देणार आहेत. याकरिता महादेव घाट, कन्हान नदी कामठी येथे पोलीस बंदोबस्तासाठी दोन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, २० सहायक पोलीस निरीक्षक/उपनिरीक्षक, २२३ पोलीस कर्मचारी तसेच आयटीबीपीचे दोन सेक्शन तसेच संपूर्ण पोलीस स्टेशन अंतर्गत ३८ गृहरक्षक दल नेमण्यात आले आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी हे स्ट्रायकिंग फोर्स तयार करून आपापल्या हद्दीत डीआरटी पथक वाहनासह पेट्रोलिंग करतील. पोलीस स्टेशन जुनी कामठी व कामठी अंतर्गत गणपती विसर्जन बंदोबस्ताचा सराव म्हणून शनिवारी शहरात रोडमार्च करण्यात आला. यात ३५ पोलीस अधिकारी, ३५० पोलीस कर्मचारी, एक आरसीपी पथक, एक आयटीबीपी पथक तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग होता.गणेश विसर्जनादरम्यान घातपात कृत्य टाळण्यासाठी कुठल्याही वस्तूला हात लावू नये, त्याबाबत तत्काळ पोलिसांना सूचना द्यावी. बंदोबस्तादरम्यान साध्या गणवेशातील विशेष पोलीस पथके सर्वत्र तैनात राहणार असून संशयितांच्या हालचालीवर करडी नजर ठेवून असतील, असेही डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)