प्राणघातक हल्ल्यात दोन गंभीर : आरोपी पळालेनागपूर : अजनीतील गुंडांच्या टोळीतील वाद गुरुवारी रात्री उफाळून आला. एका टोळीतील गुंडांनी दुसऱ्या टोळीतील तिघांवर हल्ला चढवला. मात्र, टार्गेट असलेला गुंड पळून गेल्यामुळे तो बचावला. तर, त्याचा मित्र अजय लिल्हारे याला गुंडांनी बेदम मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून अजनीत माया गँग आणि जयस्वाल गँगमध्ये धुसफूस सुरू आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले चढवून गेम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, लोकेश बसेना याच्यावर हल्ला करण्यासाठी शुभम निधेकर (रा. विश्वकर्मा नगर), अजय बागडे, विजय बागडे, विक्की तिरपुडे आणि चेतन तिरपुडे हे गुरुवारी रात्री तलवार, चाकू घेऊन पन्नासेच्या पानटपरीवर आले. मात्र, ते दुरून दिसताच लोकेशने पळ काढला. पण अखिल प्रकाश वांढरे (वय २०) आणि अजय भोजराज लिल्हारे ( वय २३) हे दोघे गुंडांच्या हाती लागले. त्यांना आरोपींनी बेदम मारहाण केली. दोघांनाही गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पळून गेले. अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच एपीआय पाटील, अभिषेक हरदास आणि त्यांच्या साथीदारांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)
अजनीत गुंडांच्या टोळीत वाद
By admin | Updated: July 4, 2015 03:12 IST