शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव कुत्रे न बांधल्यावरून ‘राडा’, दोन कुटुंबातील वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

By योगेश पांडे | Updated: April 18, 2023 17:53 IST

Nagpur News जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांवरूनच दोन कुटुंबे एकमेकांशी भिडली. पाळीव कुत्रे न बांधल्याच्या कारणावरून तुफान राडा झाला व अखेर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या

योगेश पांडे नागपूर : घरांमध्ये कुत्रे पाळत असताना काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, मात्र अनेक जण कुत्र्यांमुळे होणाऱ्या संभाव्य धोक्यांकडे दुर्लक्ष करतात व त्यातून नाहक वाद होतात. जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांवरूनच दोन कुटुंबे एकमेकांशी भिडली. पाळीव कुत्रे न बांधल्याच्या कारणावरून तुफान राडा झाला व अखेर दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या. पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कामठीतील धोबी चौकाजवळ मो. इकबाल उर्फ मो. ग्यासुद्दीन (३३) हा कुटुंबीयांसह राहतो. त्याच्या शेजारी मुन्नास्वामी पिल्ले नामक व्यक्ती कुटुंबीयांसह राहते. पिल्लेकडे दोन पाळीव कुत्रे आहेत व बरेचदा ते कुत्रे बांधलेले नसतात, तसेच बाहेर फिरत असतात. इकबालच्या तक्रारीनुसार, १६ एप्रिलच्या रात्री इकबालच्या घरातील लहान मुले खेळण्यासाठी बाहेर आली. त्याच वेळी कुत्रे बांधले नसल्याने बाहेर फिरत होते व ते मुलांच्या दिशेने धावत आले. हे पाहून इकबालने पिल्लेला कुत्रे का बांधत नाही, असा जाब विचारला. यावरून पिल्ले व इकबालमध्ये वाद सुरू झाला. त्याची मुले निशांत व लोकनाथन हेदेखील बाहेर आले. निशांतने इकबालचा भाऊ मो. जुबेरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. इकबालने मध्यस्थी केली असता त्यालादेखील लाकडाच्या दांड्याने मारले. तोच दांडा जुबेरच्या डोक्यावर मारला व त्यात तो जखमी झाला. दोन्ही भावांना वस्तीतील लोकांनी पोलिस ठाण्यात नेले व पोलिसांनी तेथून रुग्णालयात नेले. इकबालच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिल्ले व दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला.

तर दुसरीकडे पिल्लेनेदेखील शेजारच्या कुटुंबाविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पिल्लेच्या तक्रारीनुसार मो. इकबाल मो. ग्यासुद्दीन, जुबेर, इकबाल अन्सारी, बबलू अन्सारी व अक्रम अन्सारी हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर उभे होते. कुत्र्यांना बांधून का ठेवत नाही असे म्हणत त्यांनी वाद करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत घरात शिरले व मला तसेच मुलांना मारहाण केल्याचा दावा पिल्लेने तक्रारीत केला. पोलिसांनी पिल्लेच्या तक्रारीवरून चारही जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत. मात्र कुत्र्यांमुळे झालेल्या या वादाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली होती.

टॅग्स :dogकुत्रा