शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

... तू जादा गरम चल रहा क्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : घराची खिडकी लावून घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका जावयाने त्याच्या मेव्हणा तसेच चुलत सासऱ्यावर टोकदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घराची खिडकी लावून घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका जावयाने त्याच्या मेव्हणा तसेच चुलत सासऱ्यावर टोकदार शस्त्राने हल्ला चढवला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.

ईतवारी तेलीपुऱ्यात सुजीत अशोक जैन (वय ३९) राहतात. त्यांच्या बाजूलाच त्यांची चुलत बहीण आणि जावई राहतात. त्यांचे आपसात पटत नाही. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास सुजितच्या काकांनी खिडकी उघडली. सुजितने ती बंद केली. त्यावरून त्याच्या चुलत बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. तो वाढतच गेला. सुजितच्या चुलत बहिणीने तिचा पती मुकेश मनोज खरे (वय २६) याला बोलवून घेतले. वाद वाढल्याने सुजित त्यांच्या वडिलांना दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले. आरोपी मुकेश त्याच्या दोन साथीदारांना घेऊन पाठलाग करीत आला. त्यांनी सुजितला रस्त्यात अडवले आणि ‘तू जादा गरम चल रहा क्या...’ असे म्हणत आरोपींनी सुजितला टोकदार शस्त्राने मारून जखमी केले, तर त्यांच्या वडिलांना हेल्मेटने मारहाण केली, भर रस्त्यावर हा प्रकार घडला. त्यामुळे आजूबाजूच्यांनी आरोपींना आवरले. सुजितने नंतर लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी मुकेश आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. -----