शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. पंचत्वात विलीन

By admin | Updated: May 30, 2017 01:52 IST

तपस्वी रत्न पू. आचार्य नवरत्नसागरसुरीजी महाराज यांचे परमशिष्य परम तपस्वी पु. आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. सोमवारी सायंकाळी पंचत्वात विलीन झाले.

अंतिम दर्शनासाठी श्रद्धाळूंची गर्दी : कापसीत झाले अंत्यसंस्कारलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तपस्वी रत्न पू. आचार्य नवरत्नसागरसुरीजी महाराज यांचे परमशिष्य परम तपस्वी पु. आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. सोमवारी सायंकाळी पंचत्वात विलीन झाले. संजयभाई नटवरलाल मेहता यांच्या कापसी येथील शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी संभवनाथ जैन मंदिर, वर्धमाननगर येथे सकाळी ९ वाजतापासून पार्थिव ठेवण्यात आले होते. दुपारी ४ नंतर पालखी कापसी गावाकडे मार्गस्थ झाली. यात देशातील विविध भागातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू सहभागी झाले होते. पु.आ.भ. अपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. यांचा रविवारी रात्री ९.५० वाजता कालधर्म झाला होता. मंगळवारी ३० मे रोजी संभवनाथ जैन मंदिर, वर्धमाननगर येथील सभागृहात सकाळी ९ ते ११ दरम्यान गुणानुवाद आयोजित करण्यात आला आहे. श्रद्धासुमन केले अर्पितश्रमण वृंद मुनिश्री प्रशमरती विजयजी म.सा., मुनिश्री आगमरत्न सागरजी म.सा., मुनिश्री प्रशमरत्न सागरजी म.सा. व मुनिश्री वज्ररत्न सागरजी म.सा. यांच्यासोबत श्रमणीवृंद सा. सुरेखा श्रीजी, चारित्र रसा श्रीजी, विराग रसा श्रीजी, नवपूर्व रसा श्रीजी, प्रियम रसा श्रीजी, श्रियम रसा श्रीजी यांनी श्रद्धासुमन अर्पित केले. मुंबईचे विनीत गेमावत व इंदूरचे अरविंद चोरडिया यांनी स्वरांजली अर्पित करीत भजन सादर केले. संचालन संभवनाथ जैन मंदिरचे अध्यक्ष गणेशभाई जैन यांनी केले. संक्षिप्त जीवन परिचयअपूर्वमंगलरत्न सागरसुरिश्वरजी म.सा. यांचे नाव अशोक होते. त्यांचा जन्म देपालपूर, मध्य प्रदेश येथे २ मे १९५४ मध्ये झाला होता. त्यांचे वडील केशरीमलजी व आई सदुबाई होती. ते पाच भाऊ होते. यात सागरमल, समर्थमल, मणी, सुभाष व बहीण प्रभाबेन व पुष्पाबेन यांचा समावेश आहे. त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी दीक्षा घेतली होती. सलग ४२ वर्षे त्यांनी तपस्या केली. वैशाख सुद एकादशीला (भक्तामर तीर्थ) आचार्य पदवी घेतली. त्यांनी वर्धमान तप, वर्षीतपसारख्या अनेक तपस्या केल्या. देशातील अनेक राज्यांत त्यांनी भ्रमण केले. त्यांच्या कुटुंबात वडील व भाऊ यांच्यासह १० जणांनी दीक्षा घेतली आहे. त्यांच्या शिष्य परिवारात अमर, आगम, प्रशम, वज्र, रत्न सागरजी म.सा. यांचा समावेश आहे.