शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
6
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
7
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
8
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
9
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
10
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
11
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
12
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
13
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
14
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
15
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
16
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
17
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
18
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
19
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
20
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक

मंजुरीआधीच अडकल्या नियुक्त्या

By admin | Updated: November 21, 2014 00:46 IST

राज्य शासनाने लागू केलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणल्यामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित

नागपूर विद्यापीठ : मराठा आरक्षण स्थगितीमुळे महाविद्यालयांसोबत उमेदवारांची गोचीनागपूर : राज्य शासनाने लागू केलेल्या मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती आणल्यामुळे नवीन पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या अडचणीत सापडल्या आहेत. अनेक महाविद्यालयांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षण लागू करीत पदभरती केली. परंतु या निर्णयावर स्थगिती आल्यामुळे नियुक्ती होऊनदेखील अनेक प्राध्यापकांच्या पदांना विद्यापीठाची मंजुरी मिळण्याचे दरवाजे तूर्तास तरी बंद झाले आहेत. त्यामुळे नेमके करावे तरी काय या संभ्रमात महाविद्यालये तसेच उमेदवार सापडले आहेत.राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आघाडी सरकारने नारायणे राणे यांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आलेल्या एका समितीच्या अहवालानंतर मोठे निर्णय जाहीर केले होते. तत्कालीन आघाडी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर यावेळी मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १६ टक्के तर मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसरीकडे नागपूर विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांत किमान नियमित शिक्षक भरतीसंदर्भात निर्देश जारी करण्यात आले. महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची ३१ आॅक्टोबरपूर्वी नियुक्ती करण्याची अधिसूचना विद्यापीठाने २७ जुलै रोजी जारी केली होती. यानुसार अनेक महाविद्यालयांनी प्राध्यापकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली व यात मराठा आरक्षणाचे निकषदेखील लावण्यात आले होते. त्यासंबंधी पदभरतीच्या जाहिरातीमध्ये उल्लेखदेखील होता. काही महाविद्यालयांचे ‘रोस्टर’देखील लागले. त्यांनी मराठा आरक्षणानुसार प्राध्यापकांच्या नियुक्त्यादेखील केल्या व विद्यापीठाच्या मंजुरीसाठी प्रस्तावदेखील पाठविले होते.परंतु उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरच स्थगिती आणल्यामुळे महाविद्यालयांसोबतच उमेदवारांचीदेखील गोची झाली आहे. न्यायालयाची स्थगिती असल्यामुळे नियुक्ती होऊनदेखील विद्यापीठाची मंजुरी मिळणे अशक्य आहे. अशा स्थितीत आता नेमके काय करायचे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. या याचिकांवरील पुढील सुनावणी ५ जानेवारी २०१५ रोजी होणार असल्याने तोपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय हाती काहीच नाही.विद्यापीठाची भूमिका स्पष्टएखाद्या महाविद्यालयाने नियमित प्राध्यापकाची नियुक्ती केल्यानंतर विद्यापीठाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येतात. परंतु उच्च न्यायालयाने स्थगिती लावल्यामुळे विद्यापीठ संबंधित पदांना मंजुरी देणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)