शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा

By admin | Updated: April 14, 2017 02:59 IST

बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले.

जिल्हा बँक घोटाळा : हायकोर्टाचे निर्देश नागपूर : बहुचर्चित जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करा, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दिले. यासोबतच न्यायालयाने राज्य सरकार सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त सहकारी न्यायाधीशांची सुद्धा चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करू शकतात, असे सुचविले. शिवाय आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध दाखल फौजदारी गुन्ह्यासंबंधीच्या सुनावणीवरील सद्यस्थिती अहवाल उच्च न्यायालयासमक्ष सादर करण्याचेही आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, आमदार सुनील केदार या बँकेचे अध्यक्ष असताना या बँकेत तब्बल १५० कोटींचा घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्यात आ. केदार यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. शिवाय सहकार खात्याने केलेल्या चौकशीतही या सर्व आरोपींना दोषी धरण्यात आले होते. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाने अ‍ॅड़ सुरेंद्र खरबडे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नियुक्त केली होती. ती चौकशी सुरू असताना आ. सुनील केदार यांनी या संपूर्ण प्रकरणात नाबार्ड आणि जिल्हा उपनिबंधकांनाही प्रतिवादी बनविण्याची खरबडे यांच्याकडे विनंती केली होती. मात्र खरबडे यांनी ती विनंती फेटाळून लावली. त्यावर उच्च न्यायालयाने प्रथम उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु दोन्ही न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्याचवेळी अ‍ॅड़ खरबडे यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण चौकशीतून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली. त्यानुसार न्यायालयाने त्यांना चौकशीतून मुक्त केले. परंतु दुसरीकडे या संपूर्ण घोटाळ्यासंबंधी जनहित याचिका दाखल करणारे ओमप्रकाश कामडी यांनी नवीन चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करून, या संपूर्ण प्र्रकरणाची महिनाभरात चौकशी पूर्ण करावी, अशा विनंतीसह उच्च न्यायालयात अर्ज सादर केला. त्या अर्जावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई व न्या. अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठासमक्ष गुरुवारी सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारला उपरोक्त आदेश दिले. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड़ श्रीरंग भांडारकर यांनी युक्तिवाद केला तर अ‍ॅड. भारती डांगरे यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. (प्रतिनिधी)