शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कसाठी ऑडिटर नियुक्त करा : हेरिटेज संवर्धन समितीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:47 IST

ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने शुक्रवारी संबंधित विभागांना दिले.

ठळक मुद्देन्यायमूर्तींनी पाहणी केल्याने प्रशासन कामाला लागले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क हे नागपूर शहराचे वैभव आहे. येथील पुरातन वास्तूचे जतन व संवर्धनासाठी येथे डागडुजी, स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. त्यासाठी तातडीने ऑडिटरची नियुक्ती करून त्याचा अहवाल समितीपुढे सादर करा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने शुक्रवारी संबंधित विभागांना दिले.कस्तूरचंद पार्कच्या संदर्भात मनपा मुख्यालयात हेरिटेज संवर्धन समितीची बैठक झाली. नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, समितीच्या सदस्य डॉ.शुभा जोहरी, सदस्य अर्बन डिझायनर अशोक मोखा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एम. भानुसे, वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पराग पोटे, महामेट्रोचे माणिक पाटील, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लि.चे श्याम मुंधडा आदी उपस्थित होते.कस्तूरचंद पार्कच्या दुरावस्थेची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. ५ सप्टेंबरला स्वत: न्यायमूर्तींनी कस्तूरचंद पार्कच्या दुरावस्थेची पाहणी केली. यावेळी न्यायमूर्तींनी दिलेल्या सूचनांनुसार हेरिटेज संवर्धन समितीला कस्तूरचंद पार्कमधील हेरिटेज स्ट्रक्चर व इतर जुने बांधकामाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून दुरुस्तीसंबंधात सविस्तर प्लॅन तयार करून त्याचा अहवाल १७ सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश आहे. त्या अनुषंगाने समितीची बैठक घेण्यात आली. सोमवारपर्यंत स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याचा अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जे.एम. भानुसे व अशोक मोखा यांनी दिली.‘नो हॉकर्स झोन’घोषित करणारकस्तूरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणासोबतच या ठिकाणी दैनंदिन व्यवस्थापनाचे धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. याशिवाय या ठिकाणी मनपाच्या संबंधित झोनमार्फत पोलिसांच्या सहकार्याने याठिकाणी चालणाऱ्या बेकायदेशीर कार्याविरोधात सुरक्षा व्यवस्था करण्यात येणेही गरजेचे आहे. सुरक्षा भिंतीलगतच्या फूटपाथवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, हा भाग ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करून त्या संदर्भात मनपाचे संबंधित झोन आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कार्यवाही करावी, असे निर्देश समितीद्वारे संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क