शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगा अगोदर स्वामीनाथन आयोग लागू करा

By admin | Updated: February 4, 2016 02:57 IST

सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जनमंच : हजारो शेतकऱ्यांचा ७ फेब्रुवारीला मेळावानागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांकडून मागणी नसतांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुसरीकडे सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना देशाची अन्नसुरक्षा अबाधित राखण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आधी शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, नंतरच सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करा, अशी मागणी जनमंच संघटनेने केली आहे.सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करावा म्हणून शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी जनमंचतर्फे येत्या ७ फेब्रुवारीला गैरराजकीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याबाबत जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी एका पत्रपरिषदेदरम्यान माहिती दिली. वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी १ वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून कृषितज्ज्ञ व कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर व माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या ४० वर्षात शेतकी उत्पादनाचे भाव जास्तीत जास्त सात ते आठ पटीने वाढले. यावेळी सोन्याचे भाव ६७ पटीने वाढले. मात्र याचवेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात दीडशे ते दोनशे पटीने वाढ झाली आहे. प्राध्यापकांचा पगार ६०० वरून लाख रुपयावर म्हणजे २०८ पटीने वाढ झाली आहे. शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती अतिशय वाईट होत गेली. कृषितज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेतील आयोगाने २००६ साली तत्कालीन यूपीए सरकारला अहवाल सादर केला होता. मात्र त्यावेळी सरकारने हा आयोग लागू केला नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी स्वामीनाथन आयोगाची भाषा बोलणारे विद्यमान सरकारही या आयोगाबाबत गंभीर नाही, असा आरोप अ‍ॅड. किलोर यांनी केला. पत्रपरिषदेला प्रमोद पांडे, राजीव जगताप, अमिताभ पावडे, रामभाऊ आकरे, प्रकाश इटणकर, कृ.द. दाभोळकर, बाबाराव राठोड, श्रीकांत दोड, दादाराव झोडे, मनोहर रडके, राहुल जळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)