शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एम्प्रेस मॉलविरुद्ध याचिका

By admin | Updated: November 4, 2016 02:33 IST

केएसएल अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीने एम्प्रेस मॉल बांधताना कायदे व नियमांना केराची टोपली दाखविली असल्याचे पुढे आले आहे.

नागरिकांसाठी असुरक्षित : प्राथमिक सुनावणीनंतर केएसएल कंपनीला नोटीसनागपूर : केएसएल अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज कंपनीने एम्प्रेस मॉल बांधताना कायदे व नियमांना केराची टोपली दाखविली असल्याचे पुढे आले आहे. ही कंपनी प्रशासनाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत असल्याचाही आरोप होत आहे. शहरातील दोन समाजसेवकांनी एम्प्रेस मॉल नागरिकांसाठी असुरक्षित असल्याचा दावा करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिकेवर प्राथमिक सुनावणी केल्यानंतर केएसएल कंपनी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चंदू लाडे व राकेश नायडू अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत.मॉल तत्काळ रिकामा करण्याचे निर्देशमहानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने एम्प्रेस मॉलला असुरक्षित घोषित केले आहे. याविषयी २१ सप्टेंबर २०१६ रोजी नोटीस जारी करण्यात आली आहे. एम्प्रेस मॉलमध्ये अनेक सुरक्षाविषयक सुविधा नाहीत. यामुळे हा मॉल नागरिकांनी वावरण्यासाठी असुरक्षित आहे. या मॉलमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना तत्काळ जागा रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.सुधारित इमारत आराखडा नामंजूरकेएसएल कंपनीने एम्प्रेस मॉलच्या इमारतीचा सुधारित आराखडा महानगरपालिकेकडे सादर केला होता. मनपाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी हा आराखडा नामंजूर केला आहे. या निर्णयाविरुद्ध कंपनीने १६ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना कायद्याच्या कलम ४७ अंतर्गत नगर रचना मंत्रालयात अपील दाखल केले आहे. या अपीलवर लवकर निर्णय न झाल्यामुळे कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. १४ डिसेंबर २०१५ रोजी उच्च न्यायालयाने संबंधित अपीलवर १० आठवड्यांत निर्णय देण्याचा आदेश दिला होता. या कालावधीत मॉलमधील अवैध बांधकाम पाडण्यावर स्थगिती होती. असे असताना नगर रचना मंत्रालयाने अपीलवर अद्याप निर्णय दिलेला नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.फायर फिटनेस सर्टिफिकेट अर्ज फेटाळलाफायर फिटनेस सर्टिफिकेट नसताना एम्प्रेस मॉल संचालित करण्यात येत आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी १५ जुलै २०१६ रोजी मनपाच्या अग्निशमन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर कंपनीने फायर फिटनेस सर्टिफिकेटसाठी अर्ज सादर केला होता. अग्निशमन विभागाने १८ आॅगस्ट २०१६ रोजी अर्ज फेटाळून लावला. तसेच, सर्वप्रथम सुधारित इमारत आराखड्याला परवानगी मिळविण्याची सूचना करून त्यानंतर फायर फिटनेस सर्टिफिकेटसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे.‘एमपीसीबी’ची परवानगी नाहीकेएसएल कंपनीने एम्प्रेस मॉल कार्यान्वित करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) परवानगी घेतली नाही. यामुळे मंडळाने ३ आॅगस्ट २०१६ रोजी कंपनीला नोटीस जारी केली आहे. कंपनीला यावर स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. याविषयीचे पुरावे याचिकेशी जोडण्यात आले आहेत.