माेहपा : देवबर्डी (ता. कळमेश्वर) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमकि शाळा, अंबुजा फाउंडेशन, सावित्रीबाई फुले महिला बचत गट व मांडवी (ता. कळमेश्वर) ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने शाळांचा परिसर व माेकळ्या जागेवर वृक्षारोपण माेहीम राबविण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या १३५ राेपट्यांची लागवड करून ४०० बियांचे रोपण केले. या रोपट्यांच्या संवर्धन व संगोपनाची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
हा उपक्रम केंद्रप्रमुख दिलीप म्हसेकर, देवबर्डीचे मुख्याध्यापक लीलाधर ढोक, पिल्कापारचे मुख्याध्यापक विष्णू पोतले, शिक्षक हेमंत श्रीखंडे, राहुल वानखेडे, अंबुजा फाउंडेशनच्या तृप्ती गेडाम यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. यासाठी फाउंडेशनच्या ममता सिंग, चंद्रशेखर शेरजे, जयदेव बेलसरे, अक्षय कावडकर, नितीन फरकाडे, सोहम शेरजे, हिमांशू राऊत, अर्पित राऊत, नितीन फरकाडे, पवन राऊत, जीवन श्रीखंडे, गौरी श्रीखंडे, पूर्वी श्रीखंडे, प्रांजली फरकाडे, सानिका हाेले, हर्षल होले, भावेश नेहारे, विपूल बोबडे, संकेत राऊत, नकुल श्रीखंडे, प्रफुल्ल फरकाडे यांच्यासह गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.