शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

अनुष्काला मृत्यूच्या जबड्यातून ओढायचे आहे...!

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

पावसाळयातील झड असो की गोठवून टाकणारा हिवाळा, गोरखा बहादुर ऊर्फ जगतसिंग रात्रभर परिसरात फिरतो. शिटी वाजवत ‘आॅल इज वेल’चे संकेत देतो. चोर, भामट्यांनी वस्तीत शिरू नये,

दानदात्यांनी पुढे येण्याची गरजनागपूर : पावसाळयातील झड असो की गोठवून टाकणारा हिवाळा, गोरखा बहादुर ऊर्फ जगतसिंग रात्रभर परिसरात फिरतो. शिटी वाजवत ‘आॅल इज वेल’चे संकेत देतो. चोर, भामट्यांनी वस्तीत शिरू नये, म्हणून डोळ्यात तेल घालून तो जागली करतो. अनेकदा त्याची चोर, भामट्यासोबत गाठ पडते. न घाबरता तो त्यांना पळवून लावत आपले नाव सार्थ करतो. मात्र बहादूर गोरखाचा जीव आता डोळ्यात आला आहे. कारण, त्याच्या लाडक्या नऊ वर्षीय लेकीला रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) आहे. जगतसिंगच नव्हे तर त्याचा पूर्ण परिवारच त्यामुळे खचला आहे. त्याच्या अनुष्का (वय ९ वर्षे) नामक चिमुकलीला दानदात्यांच्या मदतीची तातडीने गरज आहे. चुणचुणीत अनुष्का आपल्या आजोळी धनसिंगपूर (काठमांडू, नेपाळ) तिसऱ्या वर्गात शिकायची. वारंवार आजारी पडत असल्यामुळे गेल्यावर्षी गावाकडे (धनसिंगपूर) गेलेल्या बहादूरने अनुष्काला नागपुरात आणले. तिच्यावर मेयोत उपचार सुरू झाले. २२ नोव्हेंबर २०१४ ला अनुष्काला रक्ताचा कर्करोग असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बहादूर ते ऐकून हादरला. त्याने आजूबाजूच्यांना माहिती दिली. काही सद्गृहस्थांनी मदत केली. धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात अनुष्काच्या तपासण्या झाल्या. नंतर तिला मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मुंबईत राहाण्या खाण्याचाही खर्च बहादूरच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे अनुष्काला धरमपेठेतील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये परत आणण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू आहे. अनुष्काच्या उपचारासाठी साडेतीन लाखांची तातडीने गरज आहे. वर्धमान नगरातील जयभवानी हाऊसिंग सोसायटीत चौकीदाराच्या एका लहानशा खोलीत राहाणाऱ्या बहादूरला निशा (वय ७), अखिल (वय ५) आणि रेहान (वय ७ महिने) ही मुले आहेत. त्याला चौकीदारीपोटी महिन्याला पाच हजार रुपये मिळतात. अखिल ‘स्पेशल चाईल्ड‘ असल्यामुळे एक ते दीड हजार त्याच्या उपचारावर खर्च होतात. उर्वरित रक्कमेतून बहादूर आपल्या परिवाराचे कसेबसे भरणपोषण करतो. अनुष्काच्या उपचारासाठी त्याने आतापावेतो पत्नीच्या अंगावर असलेले संपूर्ण दागिने विकले आहे. साडेतीन लाखांची रक्कम त्याच्यासाठी खूप मोठी आहे.ती कशी जमवावी, असा प्रश्न त्याच्यासकट त्याच्या पत्नीलाही पडला आहे. अनुष्काभोवती मृत्यु पाश आवळत आहे. तिला त्यातून बाहेर काढायचे आहे. त्यासाठी दानदात्यांची गरज आहे. दानदात्यांच्या पुढाकारामुळेच चुणचुणीत अनुष्का मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येऊ शकते. (प्रतिनिधी)मदतीसाठी संपर्क बहादूर ऊर्फ जगतसिंग पदम्सिंग जयभवानी हाऊसिंग सोसायटी, वर्धमाननगर, नागपूर. मोबाईल : ८४२१५६००८४, स्टेट बँक आॅफ इंडिया, ३२१४८०९९३७८, आयएफएससी कोड एसबीआयएन ०००५४६१.१५ दिवसानंतर पुढच्या उपचाराचा निर्णयअनुष्काला ब्लड कॅन्सर आहे. १५ दिवसांपासून अनुष्कावर मी आणि डॉ. प्रकाश कांकाणी उपचार करीत आहोत. आणखी १५ दिवसानंतर पुढच्या उपचाराचा निर्णय घेऊ. अनुष्कासाठी बाहेरची औषधे आणि अन्य खर्चासाठी तिच्या पालकांना किमान अडीच ते तीन लाख रुपयांची गरज भासणार आहे. डॉ. आनंद पाठक कर्करोग तज्ज्ञ, नागपूर