शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

अनुराग हरविला !

By admin | Updated: August 8, 2014 01:12 IST

चार दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करणाऱ्या अनुराग अनिल खापर्डेला त्याच्या कुटुंबीयांनी, आप्तांनी दीर्घायुषी होण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले होते. मित्र-मैत्रिणींनीही ‘तूम जियो हजारो साल’

खापर्डे कुटुंबावर दु:खाचा डोंगर : ते आनंदाचे क्षण नागपूर : चार दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करणाऱ्या अनुराग अनिल खापर्डेला त्याच्या कुटुंबीयांनी, आप्तांनी दीर्घायुषी होण्यासाठी भरभरून आशीर्वाद दिले होते. मित्र-मैत्रिणींनीही ‘तूम जियो हजारो साल’ म्हणत अनुरागवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. ज्या अनुरागला भरभरून आयुष्य जगण्याचे आशीर्वाद, शुभेच्छा दिल्या त्याच अनुरागच्या अंत्ययात्रेत केवळ चारच दिवसानंतर आपल्याला सहभागी व्हावे लागेल, अशी दुष्ट कल्पनाही कुणाच्या मनी नव्हती. मात्र, नियतीने सूड उगवला अन् आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या अनेकांना अनुरागला अंतिम निरोप देण्यासाठी आज त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. एकुलत्या एक मुलाच्या अपघाती निधनाने खापर्डे कुटुंबावर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. अनुराग दोन बहिणींमध्ये एकटाच. त्याच्यावर सर्वांचेच जीवापाड प्रेम. आईचा सर्वांत लाडका, शिवाय वडिलांचा जीवलग मित्र. तेवढाच तो मनमिळावू. हसमुख. सर्वांना हवाहवासा. मात्र बुधवारी काळाने क्षणात त्याला सर्वांपासून हिरावले. मुलाच्या निधनाने खापर्डे दाम्पत्याचा आधारच हिरावला. अनुरागला घरी सर्वजण प्रेमाने ‘निक्कू’ नावाने बोलवायचे. अनुरागचा गत २ आॅगस्ट रोजी वाढदिवस झाला. पण त्याची अभियांत्रिकीची परीक्षा सुरू असल्याने, तो वाढदिवस साजरा करू शकला नाही. त्यामुळे बुधवारी परीक्षा आटोपताच, त्याने मित्रांसोबत पार्टीची योजना आखली. अन् बुधवारी रात्री उशिरापर्यंत आनंदात वाढदिवस साजरा केला. मात्र वाढदिवसाची पार्टी आटोपून रात्री उशिरा घरी परत येत असताना, त्याच्या कारचा भीषण अपघात झाला, अन् क्षणात वाढदिवसाचा आनंद शोकात बुडाला.वेगानेच केला घात ...वाढदिवसाला मनासारखी पार्टी करता आली नाही म्हणून अनुरागने आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला अर्थात इतिशाला बर्थ डेनिमित्त शानदार पार्टी देण्यासाठी बुधवारी सायंकाळी सोबत घेतले. यावेळी त्याचा जीवाभावाचा मित्र उज्ज्वल आणि त्याची मैत्रिण श्रेयासुद्धा सोबत होती. त्यांनी वाडीजवळच्या क्लब अ‍ॅसेस लॉऊंजमध्ये पार्टी केली अन् नागपूरला परत निघाले. मध्यरात्र झाल्यामुळे की काय अनुरागने कारचा वेग जरा जास्तच वाढवला अन् वेगानेच घात केला. आईची प्रतीक्षा कायमच!अनुरागची आई काल रात्री उशिरापर्यंत आपल्या लाडक्या मुलाची घरी प्रतीक्षा करीत होती. परंतु रात्री उशिरा मुलाऐवजी त्याच्या अपघाताची बातमी घरी पोहोचली. मुलाचा गंभीर अपघात झाल्याचे कळताच, खापर्डे दाम्पत्याच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र अपघात एवढा भयंकर होता, की अनुराग जागीच ठार झाला होता. तरुण मुलाच्या मृत्यूने खापर्डे दाम्पत्य खचून गेले. त्याची आई गुरुवारी सतत अश्रू ढाळत होती. शिवाय संपूर्ण परिवार शोकाकूल वातावरणात बुडाला होता. अनुराग हा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाला शिकत होता. मुलाला कॉलेजमधून येण्यासाठी थोडाही उशीर झाला, तरी त्याची आई काळजी करीत होती. तो आपल्या वडिलांचा मुलापेक्षा एक जिव्हाळ्याचा मित्र होता. त्यांची ती मैत्री परिवारात सर्वांनाच सुपरिचित होती. अनुरागचे वडील अनिल खापर्डे महावितरणमध्ये प्रादेशिक कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. ते नुकतेच तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. शिवाय त्याची आई प्रख्यात वकील असून, ह्युमन राईट कमिशनच्या रजिस्ट्रार राहिल्या आहेत.(प्रतिनिधी)