शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अनुराधा पौडवाल यांच्या भक्तिसंगीताची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:49 IST

महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ, महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, नागपूर सुधार प्रन्यास व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची बुधवारी सांगता झाली.

ठळक मुद्देकोराडी पर्यटन महोत्सवाची सांगता : हजारो भाविकांनी लुटला आनंद

लोकमत न्यूज नेटवर्ककोराडी : महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ, महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, नागपूर सुधार प्रन्यास व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोराडी पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाची बुधवारी सांगता झाली. जागतिक पर्यटनदिनी प्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुमधूर भक्तिसंगीताची भाविकांसाठी मेजवानी ठरली. यावेळी सुमारे १० हजार श्रोत्यांनी उपस्थिती दर्शवून भक्तिगीतांचा मनमुराद आनंद लुटला.महोत्सवाच्या चतुर्थ पुष्पाची सुरुवात महाआरतीने करण्यात आली. अनुराधा पौडवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीला आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, ज्योती बावनकुळे, बापू बावनकुळे, रामदास आंबटकर, संस्थानचे सचिव केशव फुलझेले, विश्वस्त प्रेमलाल पटेल, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, महादुल्याच्या नगराध्यक्ष सीमा जयस्वाल, रामदास महाराज, हनुमंत हेडे, अरुण सिंग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या महोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या आठ हजार प्रेक्षकक्षमतेचा शामियाना तब्बल १० हजार श्रोत्यांनी खचाखच भरला होता. व्हीआयपी, व्हीव्हीआयपीसह सर्व आसनव्यवस्था फुल्ल झाल्यावर आयोजकांना वेळेवर अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. कार्यक्रमस्थळी तिन्ही बाजूने मोठ्या संख्येत भाविक उभे होते. अक्षरश: भक्तांचा महासागर लोटला होता.नागपूरकरांची मने जिंकली : चंद्रशेखर बावनकुळेअनुराधा पौडवाल यांच्या भक्तिसंध्येला आलेला हा मोठा जनसमुदाय नागपूरकरांच्या प्रेमाची ग्वाही देत असून पौडवाल यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली. दोन वर्षांचा हा कोराडी महोत्सव भविष्यात असाच बहरत जाणार आहे. सामाजिक ऐक्य, धार्मिक सलोखा, संस्कृती जतनासाठी अशा महोत्सवांची गरज आहे. या महोत्सवाला आर्थिक सहकार्य करणारे, आयोजनासाठी मेहनत घेणारे सर्व अधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक खºया अर्थाने अभिनंदनास पात्र असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.यासोबतच विजय दर्डा यांनी अभ्यंकरनगर येथील अभ्यंकरनगर दुर्गा उत्सव मंडळाला भेट देत दुर्गादेवीचे दर्शन घेतले. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर रामदासपेठ प्लॉट ओनर्स अ‍ॅण्ड रेसिडेंट असोसिएशनच्यावतीने आयोजित रासगरबा उत्सवातही ते सहभागी झाले.