शहरं
Join us  
Trending Stories
1
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
4
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
5
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
6
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
7
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
8
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
9
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
10
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
11
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
12
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
13
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
14
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
15
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
16
'ती गुन्हेगार नाही...', भारत-पाक तणावावेळी वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या तरुणीला केली होती अटक, हायकोर्टाने फटकारले
17
India Bangladesh Border Tensions: बांगलादेश सरकारचे सल्लागार जहांगीर यांनी वाढवलं युनूस यांचं 'टेन्शन'; भारताविरूद्ध ओकली गरळ
18
प्रेमासाठी मोलकरीण बनली चोर, ज्या घरात करायची धुणीभांडी तिथेच मारला डल्ला, त्यानंतर...  
19
गौहर खाननं लग्नासाठी धर्मांतराची अट घातली, अभिनेत्यानं संपवलं नात; कुशाल टंडनचा खुलासा

हल्ला करणाऱ्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: September 25, 2016 03:16 IST

एका खून खटल्यातून निर्दोष ठरल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊ नये म्हणून एकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी

नागपूर : एका खून खटल्यातून निर्दोष ठरल्यानंतर सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊ नये म्हणून एकावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. खुनी हल्ल्याचे हे प्रकरण कामठी येथील आहे. बबलू कुरेशी इक्बाल अहमद कुरेशी, असे आरोपीचे तर शेख सलीम शेख शब्बीर (२७) रा. मच्छिपूल शास्त्री चौक कामठी, असे जखमीचे नाव आहे. प्रकरण असे की, काही वर्षांपूर्वी शेख सलीम याचा भाऊ इम्रान याचा फुलओळी चौक कामठी येथील रहिवासी शेख समीर ऊर्फ कव्वा रफिक अहमद (३१) याने खून केला होता. सत्र न्यायालयात खटला चालून कव्वा याची निर्दोष सुटका करण्यात आली होती. निर्दोष सुटकेविरुद्ध मृत इम्रान याचा भाऊ शेख सलीम याने उच्च न्यायालयात अपील करू नये म्हणून ४ सप्टेंबर २०१६ रोजी रात्री ११.३० वाजंताच्या सुमारास नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कळमना टी पॉर्इंटवर एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपींनी शेख सलीम याला रोखले. त्यावेळी शेख सलीम हा कामावरून आपल्या घराकडे परतत होता. आरोपींपैकी बबलू कुरेशी याने ‘मारो इसको’ असे म्हटले होते. त्याच वेळी मुजबील आणि जफर यांनी सलीमला पकडून समीर ऊर्फ कव्वा याने ठार मारण्याच्या हेतूने हातबुक्क्या आणि लोखंडी सब्बलने हल्ला केला होता. सलीमचा उजवा पाय फ्रॅक्चर करून त्याला गंभीररीत्या जखमी केले होते. जुना कामठी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा यांनी वैद्यकीय अहवाल आणि जखमी सलीमच्या बयाणावरून हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ५ सप्टेंबर २०१६ रोजी शेख समीर ऊर्फ कव्वा आणि मुजबील हुसेन मुज्जफर हुसेन (२४) रा. हैदरी चौक यांना अटक केली होती. बबलू कुरेशी आणि जफर बाडेवाला हे फरार आहेत. गुन्ह्यात वापरलेली कार बबलू कुरेशी याची आहे. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता प्रकरण गंभीर असल्याने तसेच तो गुन्हा करण्याच्या सवयीचा असल्याने आणि आरोपीची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील मदन सेनाड यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)