शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

कामगार विरोधी धोरण

By admin | Updated: September 3, 2016 01:03 IST

देशातील सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनसह ११ केंद्रीय कर्मचारी कामगार संघटना,

संपाचा फटका : शासकीय कार्यालये व बँका बंदनागपूर : देशातील सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनसह ११ केंद्रीय कर्मचारी कामगार संघटना, केंद्रीय फेडरेशन आणि बँकिंग व विमा क्षेत्रातील सहा संघटनांनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करीत २ सप्टेंबरला देशव्यापी संप पुकारला. त्याचा परिणाम नागपुरात दिसून आला. सर्व शासकीय कार्यालय आणि बँकांचे आर्थिक व्यवहार व कामकाज ठप्प झाले. या संपात भारतीय मजदूर संघाने भाग घेतला नाही. या संघटनेशी संलग्न कर्मचारी आणि अधिकारी बँकिंग व शासकीय कामकाजात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामांवर संपाचा फारसा परिणाम झाला नाही. कामगारांच्या कृती समितीच्या बॅनरखाली कस्तूरचंद पार्क येथील दुपारी झालेल्या सभेत नागपुरातील कामगार संघटना, स्वतंत्र फेडरेशन, वित्तीय क्षेत्रातील बँका व विमा, सार्वजनिक व खासगी उद्योगातील कर्मचारी, कंत्राटी कामगार, कृषी क्षेत्रातील मजूर, शेतकरी कामगार पाच हजारांपेक्षा जास्त संख्येने उपस्थित होते. कामगार कायद्यातील सुधारणांचा फटका बसणारकेंद्र सरकार देशविदेशातील मोठ्या कंपन्यांसाठी कामगार कायदे लवचिक करीत आहेत. एकूण ४४ कामगार कायदे एकत्रित करून चार वर आणण्यात येत आहेत. पूर्वी सात कर्मचाऱ्यांना युनियन उभी करण्याची मुभा होती. पण नवीन कायद्यांतर्गत संघटनेत किमान ३० कामगार असणे आवश्यक आहे. कामगारांच्या हक्कासाठी असलेली चळवळ केंद्राला संपवून टाकायची आहे. स्थायी कर्मचाऱ्यांना हटवून कंत्राटी पद्धतीवर कामगारांना नेमायचे आहे. त्यामुळे कामगारांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होणार आहे. कामगारविरोधी धोरणाचा निषेध करीत सरकारचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन नेत्यांनी सभेत मार्गदर्शन करताना केले. किमान ३ हजार मासिक पेन्शन देण्याची आणि महागाईवर नियंत्रण आणण्याची मागणी सभेत करण्यात आली. सभेत सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ( सविस्तर वृत्त/७)संपात सहभागी संघटनानागपुरात शुक्रवारी पुकारलेल्या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, कामगार संघटना संयुक्त कृती समिती नागपूर, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, जॉईन फोरम आॅफ युनियन्स अ‍ॅण्ड असोसिएशन आॅफ पीएसजीआय कंपनीज नागपूर युनिट, महाराष्ट्र विक्रीकर कर्मचारी संघटना, आॅल इंडिया ट्रेड युनायटेड सेंटर, सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियन, विदर्भ लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ, आयकर कर्मचारी फेडरेशन व आयकर राजपात्रित अधिकारी असोसिएशन आदींसह राष्ट्रीयकृत बँकांच्या एआयबीईए, एआयबीओए, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, बीईएफआय, ईएमबीईए या संघटनांनी भाग घेतला.