शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अपमानाला कर्तृत्वाने दिले उत्तर

By admin | Updated: June 19, 2015 02:27 IST

सातवीत शिकणाऱ्या नीतेशच्या मित्राला एकदा शाळेचा पुरस्कार मिळाला. मित्राच्या दिवाणखाण्यात चकाकणाऱ्या त्या पुरस्काराला स्पर्श करण्याचा मोह अबोध नीतेशला आवरला नाही.

नागपूर : सातवीत शिकणाऱ्या नीतेशच्या मित्राला एकदा शाळेचा पुरस्कार मिळाला. मित्राच्या दिवाणखाण्यात चकाकणाऱ्या त्या पुरस्काराला स्पर्श करण्याचा मोह अबोध नीतेशला आवरला नाही. त्याने त्या पुरस्काराच्या दिशेने हात पुढे केला अन् तेवढ्यात त्या मित्राची आई कडाडली...‘‘थांब हा माझ्या मुलाचा पुरस्कार आहे आणि त्याला स्पर्श करण्याची तुझी लायकी नाही’’ हे बोचरे शब्द नीतेशला घायाळ करून गेले. त्याचवेळी त्याने असे अनेक पुरस्कार पायाशी लोळण घालतील असे कर्तृत्व करून दाखवण्याचा संकल्प केला व घरच्या गरिबीचा बाऊ न करता स्वत:ला झोकून दिले प्रयत्नांच्या यज्ञकुंडात. त्याचे हे परिश्रम अखेर कामी आले. काल-परवाच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत त्याने ९४.४० टक्के गुण मिळवले. नीतेशने त्याच्या अपमानाला कर्तृत्वाने उत्तर दिले असून आज अनेक पुरस्कार खरंच त्याच्या ओंजळीत सामावले आहेत. नीतेश चंद्रशेखर पुडके असे या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव. नंदनवनातील ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात तो शिकतो. हसनबाग चौकात त्याचे किरायाचे घर आहे. वडील हातमजुरी करतात. आई केकच्या कंपनीत कामाला जाते. कुठल्याही गरीब कुटुंबात असतात त्या सर्वच समस्या नीतेशच्या घरातही आहेत. परंतु या समस्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी त्याने पेपर वाटण्याचा निर्णय घेतला. पहाटे ५ ला उठून तो ९० घरी पेपर वाटायचा. तिकडून परतल्यावर शाळा. शाळेतून परतल्यावर घरकाम आणि त्यातून वेळ काढून अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. नीतेशची संघर्षगाथा : प्रतिकूलतेचा चक्रव्यूह भेदूून दहावीत मिळवले यशसायकल हवी, पण बोलू कसे?साधे ६० टक्के गुण मिळवले तरी पालक आपल्या मुलांना डोक्यावर घेतात. त्यांनी मागितल्या नसतानाही अनेक सुविधा त्यांच्या पुढ्यात ठेवल्या जातात. परंतु घरच्या गरिबीमुळे नीतेशकडे ती सोयही नाही. त्याला आता कॉलेजला जायला सायकल हवी आहे परंतु रोजच्या जेवणासाठी वडील करीत असलेला संघर्ष त्याच्यापासून लपून राहिलेला नाही. अशा स्थितीत सायकलबाबत वडिलांना कसे बोलावे, असा प्रश्न त्याला पडला आहे.