शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

उत्तरने कमावले दक्षिणने गमावले

By admin | Updated: February 25, 2017 03:06 IST

महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे दहा नगरसेवक निवडून आले. तर तब्बल १३ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

बसपाची घौडदोड कुठे थांबली ? : १३ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आनंद डेकाटे   नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे दहा नगरसेवक निवडून आले. तर तब्बल १३ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. एक उमेदावर केवळ १४ मतांनी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. बसपाचे जिंकलेले उमेदवार हे सर्व उत्तर नागपुरातून निवडून आले. दक्षिणेत एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. इतकेच नव्हे तर दक्षिण नागपुरात असलेल्या पक्षाच्या दोन जागा सुद्धा कायम ठेवता आल्या नाही. दुसरीकडे उत्तर नागपूरने मात्र गेल्या वेळच्या तुलनेत दोन नगरसेवक जास्तीचे निवडून दिले. त्यामुळे या निवडणुकीत बसपाचा विचार केला असता बसपाने उत्तर नागपुरात कमावले असून दक्षिण नागपुरात मात्र गमावले आहे. गेल्या निवडणुकीमध्ये बसपाने ९८ जागा लढविल्या होत्या. यापैकी त्यांचे एकूण १२ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी ८ नगरसेवक हे उत्तर नागपुरातून तर दोन नगरसेवक दक्षिण नागपुरातून निवडून आले होते. दक्षिण-पश्चिम व पूर्व नागपुरातून प्रत्येकी एक नगरसेवक निवडून आला होता. १२ उमेदवार हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते. त्यावेळी एकूण उमेदवारांनी दीड लाखावर मते घेतली होती. या निवडणुकीमध्ये बसपाने एकूण १०३ उमेदवार निवडणुकीत उतरविले होते. यामध्ये १० नगरसेवक निवडून आले. तर १३ नगरसेवक हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. निवडून आलेले सर्व उमेदवार हे उत्तर नागपुरातूनच विजयी झाले, हे विशेष. म्हणजेच गेल्या वेळच्या तुलनेत उत्तर नागपूरने दोन नगरसेवक अधिकचे निवडून दिले. पश्चिम नागपुरातील काही भाग उत्तर नागपुरात जोडण्यात आला. हा भाग दलित बहुल असल्याचा फायदाही बसपाला मिळाला. निवडून आलेले सर्व उमेदवार हे नवीन आहेत, हे विशेष. या निवडणुकीमध्ये सुद्धा बसपाने जवळपास १ लाख ५० हजाराच्या जवळपास मते घेतली आहेत. मतांची टक्केवारी कायम राखण्यात बसपाला यश आले. दक्षिण नागपुरातील दोन जागा बसपाने गमावल्या. पूर्व नागपुरातून सागर लोखंडे यांचा अर्ज रद्द झाल्याने ते निवडणूक होण्यापूर्वीच पराभूत झाले. दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना मिळालेली मते प्रभाग क्र. २ अर्चना शेंडे (७४०८), मंगेश ठाकरे (७६४७), रिना साळवे (८१३९), गौतम पाटील (५५१५), प्रभाग क्र. ५ पृथ्वीराज शेंडे (४६६९) प्रभाग क्रमांक ७ अभिषेक शंभरकर (७१३०), प्रभाग क्रमांक ९ किरण रोडगे-पाटणकर (७५५८), प्रभाग क्रमांक १७ प्रेरणा कुकडे (९३७५), तृप्ती नानवटकर (७७९०) प्रभाग क्र. ३३ अजय डांगे (१०१५५), भारती महल्ले (९७४१), सत्यभामा लोखंडे (९९५९), प्रभाग ३५ मेघा हाडके (७५२०) यांचा समावेश आहे. बसपाचे जिल्हाध्यक्ष जयकर व प्रदेश सचिव रमेश लोखंडे दक्षिण नागपुरातच राहतात. जयकर यांच्याकडे दक्षिणचा प्रभार होता. सर्व जागा त्यांनी वाटल्या. दक्षिण नागपुरात एकूण २८ जागा आहेत. परंतु १४ जागा लढविल्याच गेल्या नाहीत. जयकर यांनी आपल्या पुत्राला लढविले तर लोखंडे यांनी आपल्या पत्नीला लढविले. पुत्र व पत्नी प्रेमामुळे पक्षाला प्रचंड नुकसान झाले. दक्षिण नागपुरातून बसपा हद्दपार झाली. पक्ष तब्बल दहा वर्षे मागे गेला. तेव्हा नैतिकतेच्या आधारावर जिल्हाध्यक्ष व सचिवांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. उत्तम शेवडे, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयीन सचिव बसपा