शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफिया ग्वालबन्सीला आणखी एक दणका

By admin | Updated: May 14, 2017 02:12 IST

कोराडी मार्गावरील मौजा झिंगाबाई टाकळी येथील तवक्कल हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर भूमाफीया दिलीप ग्वालबन्सी याने झोपडपट्टी वसविली होती.

नासुप्रची कारवाई : ४० झोपड्यांवर चालला बुलडोझर लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोराडी मार्गावरील मौजा झिंगाबाई टाकळी येथील तवक्कल हाऊसिंग सोसायटीच्या जागेवर भूमाफीया दिलीप ग्वालबन्सी याने झोपडपट्टी वसविली होती. येथील १६० झोपड्यापैकी १२० झोपड्या गेल्या मंगळवारी हटविण्यात आल्या होत्या. यातील शिल्लक ४० झोपड्या शनिवारी नासुप्रच्या अतिक्रमण विभागाच्या प्रथकाने जमीनदोस्त केल्या. सकाळी १० च्या सुमारास ३ जेसीबीसह नासुप्रचे पथक सोसायटीच्या जागेवर पोहचले. परंतु झोपडपट्टीधारक ांनी कारवाईला विरोध दर्शविला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलीस पथक पोहचताच पथकाने अतिक्रमण हटविण्याला सुरुवात केली. यात तीन दोन मजली इमारतींचाही समावेश आहे. अतिक्रमणधारकांना अन्यत्र जाण्याचा सल्ला देण्यात आला. पुन्हा अतिक्रमण केल्यास कारवाईचा इशारा नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिला. गेल्या मंगळवारी नासुप्र व महापालिकेच्या पथकाने १२० झोपड्या हटविल्या होत्या. परंतु रात्र झाल्याने कारवाई थाबंविण्यात आली होती. यामुळे ४० झोपड्या शिल्लक होत्या. या जागेवर गेल्या १० ते १२ वर्षापूर्वी ग्वालबन्सी यांने ही झोपडपट्टी वसविली होती. काहींनी पक्की घरे उभारली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर अतिक्रमण काढण्यासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने येथील अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नासुप्र व महापालिकेच्या पथकांनी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. नासुप्रचे अधिकारी प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी अनिल राठोड, पथक प्रमुख वसंत कन्हेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. काही गेले ; काहींचा ठिय्या कायम नासुप्र व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गेल्या मंगळवारी अतिक्रमण हटविल्यानंतर बहुतांश कुटुंब आपले सामान घेऊ न दुसरीकडे वास्तव्यास गेलेले आहेत. परंतु काही कुटुंब अजूनही तवक्कल सोसायटीच्या जागेवरून हटविण्यात आलेल्या आपल्या घराच्या जागेवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे मूळ प्लॉटधारकांना आपली जागा ताब्यात कशी घ्यावी, असा प्रश्न पडला आहे.