शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

विदर्भ निर्माण महामंचचे सहा उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:43 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवतील.

ठळक मुद्देनागपुरातून बीआरएसपीचे सुरेश माने : पहिली यादी जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - स्वतंत्र विदर्भ राज्याचा संकल्प करीत विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. विविध १२ पक्ष व संघटनांनी मिळून हा महामंच तयार झाला आहे. या मंचांतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार असून शुक्रवारी सहा उमेदवारांची घोषणा करण्यात आली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवतील.महामंचचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी ही घोषणा केली. विदर्भातील उर्वरित चार लोकसभा मतदार संघाचे उमेदवार येत्या २० मार्च रोजी जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.विदर्भ निर्माण महामंचमध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी, जांबुवंतराव धोटे विचार मंच, विदर्भ माझा, प्रावॅटिस्ट ब्लॉक पार्टी आॅफ इंडिया, लोकजागर पार्टीसह विविध घटक पक्षांचा समावेश आहे.पत्रपरिषदेला राम नेवले, श्रीकांत तराळ, आम आदमी पार्टीचे डॉ. देवेंद्र वानखेडे, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राजेश काकडे, विदर्भ माझाचे मंगेश तेलंग, रमेश जनबंधू, राजेश बोरकर, सुनील चोखारे आदींसह ज्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली ते सर्व उमेदवार उपस्थित होते.काँग्रेस-भाजप विरुद्ध सक्षम पर्यायस्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हा एकमेव संकल्प घेऊन विदर्भ निर्माण महामंच निवडणुकीत उतरत आहे. हे सुद्धा एक आंदोलनच आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षाविरुद्ध सक्षम तिसरा पर्याय म्हणून आम्ही राहणार असल्याचे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले.विदर्भाचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेऊस्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसोबतच येथील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन ही निवडणूक लढवत आहोत. यासोबतच निवडणुकीच्या माध्यमातून विदर्भाचा प्रश्न हा राष्ट्रीय स्तरावर नेण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. सुरेश माने यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीसोबत अजुनही आमची चर्चा सुरु असल्याचेही अ‍ॅड. माने यांनी यावेळी सांगितले.श्रीहरी अणे निवडणूक लढणार नाहीअ‍ॅड. श्रीहरी अणे आणि राजकुमार तिरपुडे हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही का, या प्रश्नाचे उत्तर देताना अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सांगितले की, अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नावावरही चर्चा सुरु होती. परंतु कौटुंबिक कारणामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजकुमार तिरपुडे हे विधानसभेची निवडणूक लढवणार असून आपण स्वत: विधानसभेची तयारी केली असल्याने लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचेही अ‍ॅड. चटप यांनी सांगितले.भाजपला हरवणे हेच आपचे लक्ष्यसंविधान वाचवण्यासाठी भाजपला हरवणे हेच पक्षाचे लक्ष्य असल्याचे आम आदमी पार्र्र्टीचे देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले. भाजपला हरवण्यासाठी आप सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहे. जिथे सक्षम असून तिथेच उमेदवार उभा करू, असेही त्यांनी सांगितले. 

हे आहेत विदर्भ निर्माण महामंचचे  उमेदवार

  • नागपूर - सुरेश माने
  • भंडारा- देवीदास लांजेवार
  • रामटेक-चंद्रभान रामटेके
  • चंद्रपूर -दशरथ मडावी
  • वर्धा - ज्ञानेश वाकुडकर
  • अमरावती -नरेंद्र कठाणे
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVidarbhaविदर्भ