शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अनिरुद्ध ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महाविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 10:31 IST

महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.

ठळक मुद्देनागपूरला मिळाली ‘मानाची कट्यार’महाअंतिम फेरीत चौघांना टाकले मागे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्मजात लाभलेला गोड गळा अन् गायनातील नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे महाराष्ट्र संगीत रत्न, सारेगमप यासारख्या मोठ्या स्पर्धा जिंकणाऱ्या अनिरुद्ध जोशी या नागपूरकर गायकाने शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, एका मराठी वाहिनीवरील अत्यंत गाजलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ या स्पर्धेचा तो महाविजेता ठरला आहे.८ एप्रिल रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या या महाअंतिम फेरीत परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते या दोन्ही बाजूंवर अनिरुद्ध अव्वल ठरला. नागपूरकर रसिकांनी अनिरुद्धला भरभरून मते दिली. या महाअंतिम फेरीत अनिरुद्धबरोबर निहिरा जोशी, शरयू दाते, प्रसेनजित कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर हे तगडे स्पर्धक होते. या स्पर्धेचे परीक्षण महेश काळे, अवधूत गुप्ते आणि शाल्मली खोलगडे यांनी केले. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सचिन पिळगावकर हे महाअंतिम सोहळ्याचे प्रमुख पाहुूणे होते. अनिरुद्धने या कार्यक्रमात सुरवातीपासून अप्रतिम गाणी सादर करून पाच वेळा कट्यार मिळविली होती. महाअंतिम फेरीत तर ही कट्यार कायमची त्याची झाली.

ही स्पर्धा माझ्यासाठी एक मोठे स्वप्न होते. मी या स्पर्धेचा महाविजेता ठरल्याने ते साकार झाले आहे. यापुढे गायक आणि संगीतकार म्हणून मला कारकीर्द घडवायची आहे. माझ्या या सांगितिक प्रवासात नागपूरकर रसिकांनी मला नेहमीच साथ दिली. यावेळीसुद्धा त्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला. नागपूरकरांचे माझ्यावरील हे प्रेम बघून मी भारावून गेलो आहे.- अनिरुद्ध जोशी

टॅग्स :musicसंगीत